ETV Bharat / state

मोदींनी दहशतवाद्याला उमेदवारी दिली, ते दहावी नापास; प्रकाश आंबेडकरांचा आरोप - उमेदवारी

दहशतवाद संपवला म्हणणारे पंतप्रधान दहशतवाद्यालाच उमेदवारी देतात, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच मोदी दहावी नापास असल्याचा गंभीर गौप्यस्फोटही त्यांंनी केला आहे.

कुडाळ येथे वंचित बहुजन आघाडीची सभा
author img

By

Published : Apr 20, 2019, 7:05 PM IST

Updated : Apr 20, 2019, 7:25 PM IST

सिंधुदुर्ग - कसाब जसा दहशदवादी होता, तशीच ही साध्वी दहशतवादी आहे. दहशतवाद संपवला म्हणणारे पंतप्रधान दहशतवाद्यालाच उमेदवारी देतात, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी प्रज्ञा सिंहांच्या उमेद्वारीवरून मोदींवर जोरदार निशाणा साधला. ते कुडाळ येथील वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत बोलत होते.

कुडाळ येथील सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मारुती जोशी यांच्या प्रचारासाठी आंबेडकर सिंधुदुर्गात आले होते. कुडाळ येथे वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांनी हुतात्मा करकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा चांगलाच समाचार घेतला.

मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवरदेखील आंबेडकरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच मोदी दहावी नापास असल्याचा गंभीर गौप्यस्फोटदेखील त्यांनी केला. विशेष म्हणजे मोदींना शैक्षणिक पात्रता सिद्ध करण्याचे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

Intro:कसाब जसा टेररिस्ट होता तशीच ही साध्वी टेररिस्ट आहे. दहशतवाद संपवला म्हणणारे प्रधानमंत्री दहशतवाद्यालाच उमेदवारी देतात. असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी प्रज्ञा सिंगच्या उमेद्वारीवरून मोदींवर जोरदार निशाणा साधला. ते कुडाळ येथील वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत बोलत होते. Body:रत्नागिरी सिंधूदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मारुती जोशी यांच्या प्रचारासाठी आंबेडकर सिंधुदुर्गात आले होते. कुडाळ येथे वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा पार पडली. यावेळी साध्वी प्रज्ञा सिंग यांनी शहिद करकरे यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा चांगलाच समाचार घेतला. Conclusion:मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवर देखील आंबेडकर यांनी यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच मोदी दहावी नापास असल्याचा गंभीर गौप्यस्फोट देखील केला. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना शैक्षणिक पात्रता सिद्ध करण्याचे आव्हानच या सभेदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.

बाईट: प्रकाश आंबेडकर, नेते- वंचित बहुजन आघाडी.
Last Updated : Apr 20, 2019, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.