ETV Bharat / state

'महामार्गासाठी जमिनी दिलेल्यांचे प्रलंबित 130 कोटी आठवडाभरात मिळवून देणार' - उदय सामंत न्यूज

जिल्ह्याच्या विकासासाठी आणि पर्यटनाच्या दृष्टीने पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये चिपी विमानतळ ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत दुपदरीकरण, राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमिनी दिलेल्या भूमिपूत्रांचे प्रलंबित 130 कोटी रुपये आठवडाभरात मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

uday samant
पालकमंत्री उदय सामंत
author img

By

Published : May 3, 2020, 5:15 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्याच्या विकासासाठी आणि पर्यटनाच्या दृष्टीने पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये चिपी विमानतळ ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत दुपदरीकरण, राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमिनी दिलेल्या भूमिपूत्रांचे प्रलंबित 130 कोटी रुपये आठवडाभरात मिळवून देणार. तसेच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील 5 शासकीय विश्रामगृहांचे सुशोभिकरण, सिंधुदुर्गनगरी व कणकवलीतील शिवपुतळ्यांची उभारणी आदी कामांचा यात समावेश आहे.

पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आम्ही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे सामंत म्हणाले. सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे चिपी विमानतळ ते राष्ट्रीय महामार्गदरम्यानच्या मार्गाचे दुपदरीकरण करणे. यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर याच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वेंगुर्ले, मालवण, कणकवली, सावंतवाडी आणि देवगड अशा 5 शासकीय विश्रामगृहांचे सुशोभिकरण व सुसज्जतेसाठी 14 कोटी रुपये मंजूर करून तो निधी प्राप्तही करून घेतल्याचे त्यांनी सांगितले.

आंगणेवाडी तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबत बोलताना सामंत म्हणाले, की आतापर्यंत आंगणेवाडीची यात्रा आली की या तीर्थक्षेत्र विकासाच्या केवळ घोषणाच व्हायच्या. प्रत्यक्षात काहीच होत नसे. आपण याबाबत गांभिर्याने लक्ष घालून या यात्रेला येणारे भाविक व लगतच्या तिन्ही गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी 22 कोटी रुपये मंजूर केले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमिनी दिलेल्या भूमिपुत्रांचे प्रलंबित असलेले 130 कोटी रुपये तातडीने मिळावेत. यासाठी आपण केंद्र शासनाच्या संबंधित खात्याला पत्र लिहिले असून, येत्या आठवडाभरातच ही सर्व रक्कम भूमिपुत्रांच्या खात्यात निश्चितपणे जमा होईल, असे ते म्हणाले.

वेंगुर्ल्यातील सेंट लुक्स हॉस्पिटलच्या पुनः उभारणीसंदर्भात माहिती देताना ते म्हणाले, की येत्या काही दिवसात या हॉस्पिटलमध्ये ओपीडी व आयसीयू युनिट सुरू होणार आहे. पुढील सहा महिन्यांच्या आत पूर्ण क्षमतेने हे हॉस्पिटल सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे सामंत म्हणाले.

सिंधुदुर्गच्या राजधानीत लवकरच भव्य राष्ट्रध्वज
सिंधुदुर्गची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरीच्या प्रवेशद्वारानजीक असलेला शिवपुतळा बदलून त्या ठिकाणी शिवरायांचा नवा भव्य अश्वारुढ पुतळा, त्याचप्रमाणे सभोवतालचे शिवोद्यान नव्याने उभारण्यास लवकरच सुरुवात केली जाणार आहे. तसेच याच राजधानीत जिल्ह्यातील सर्वाधीक म्हणजेच 30 मीटर उंचीचा 24 तास फडकणारा भव्य राष्ट्रध्वज उभारण्याचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.