ETV Bharat / state

ऊस तोडणी कामगारांच्या कमतरतेमुळे सिंधुदुर्गात केवळ 30 टक्‍केच तोडणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 हजार 250 हेक्‍टर उसापैकी आतापर्यंत 30 टक्केच उसाची तोडणी झाली आहे. कोरोनामुळे ऊसतोड मजूर कमी आल्यामुळे ऊसतोडणीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Feb 4, 2021, 10:11 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील 1 हजार 250 हेक्‍टर उसापैकी आतापर्यंत 30 टक्केच उसाची तोडणी झाली आहे. कोरोनामुळे ऊसतोड मजूर कमी आल्यामुळे ऊसतोडणीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. धिम्यागतीने होणाऱ्या ऊसतोडणीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षात ऊस तोडणीच्या समस्येमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच यावर्षी या समस्येत आणखी भर पडल्यामुळे नव्या लागवडीवर त्याचा परिणाम होणार आहे. मात्र, कारखाना प्रशासनाकडून कामगार वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांनी केला होता 1 लाख टन ऊसाचा टप्पा पार

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना, असळज (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथे अस्तित्वात आल्यानंतर या कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी आणि कणकवली, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या तीन तालुक्‍यात ऊसाचे क्षेत्राबरोबर उत्पादन देखील वाढले. 1 लाख टन ऊसाचा टप्पा येथील शेतकऱ्यांनी पार केला होता. पण, ऊसतोडणीच्या समस्येने हैराण झालेल्या काही शेतकऱ्यांनी ऊस शेतीतून माघार घेतली.

अतिशय धिम्या गतीने सुरू आहे तोडणी

सध्या या तीन तालुक्‍यात सुमारे 1 हजार 250 हेक्‍टर क्षेत्र ऊस शेतीखाली आहे. यावर्षी 70 हजार टन उत्पादन अपेक्षित आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऊस तोडणीला सुरुवात झाली. पण, कोरोनामुळे कारखान्याकडे ऊसतोडणी कामगार येण्याचे प्रमाण हे अत्यल्प आहे. त्यामुळे या तिनही तालुक्‍यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच टोळ्या सुरुवातीला पाठविण्यात आल्या. त्यामुळे अतिशय धिम्या गतीने तोडणी सुरू आहे. जानेवारी संपला तरी अजून 20 ते 22 हजार टन ऊस तोडणी झाली आहे.

शेतकरी ऊस शेतीपासून दूर होण्याची शक्‍यता

अजूनही मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हलचल निर्माण झाली आहे. शेतकरी सतत कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांकडे तोडणीविषयी विचारणा करत आहेत. गेल्या आठवड्यापासून कारखान्याने तोडणी टोळ्यामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे काही अंशी तोडणीचा वेग वाढला आहे. ऊसतोडणीच्या समस्येमुळे येथील अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवड बंद केली आहे. त्याच समस्येचा यावर्षी सुध्दा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे यावर्षी तोडणी कामगार कमी आले आहेत. त्याचा परिणाम एकूणच ऊस शेतीवर होण्याची शक्‍यता आहे. ऊसतोडणी कामगारांचा परिणाम नव्याने होणाऱ्या ऊस लागवड क्षेत्रावर होणार आहे. अगोदरच अनेक शेतकरी ऊस लागवडीतून बाजूला झाले आहेत. त्यामुळे आणखी काही शेतकरी ऊस शेतीपासून दूर होण्याची शक्‍यता आहे.

पर्याय निर्माण करणे आवश्‍यक

कोकणातील शेतकऱ्यांनी आता ऊस लागवडीसोबत तोडणीचे तंत्र समजून घेणे आवश्‍यक आहे. भविष्यात ऊस तोडणी कामगारांची कमतरता भासणार हे निश्‍चित आहे. या समस्येवर मात करण्याचा नापणे जैतापकरवाडी येथील काही शेतकऱ्यांनी प्रयोग केला आहे. येथील आठ ते दहा पुरूष आणि महिला शेतकऱ्यांनी स्वत:च्या उसाची तोडणी, भरणी करून आदर्श ठेवला आहे.

हेही वाचा - सिंधुदुर्गात मरिनपार्क विरोधात मच्छिमारांचा एल्गार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.