ETV Bharat / state

Nitesh Rane in Sindhudurg Court : नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण - Nitesh Rane in Sindhudurg Court

Nitesh Rane surrenders in Sindhudurg court
नितेश राणे सिंधुदुर्ग न्यायालयात शरण
author img

By

Published : Jan 28, 2022, 12:00 PM IST

Updated : Jan 28, 2022, 12:33 PM IST

11:59 January 28

Nitesh Rane in Sindhudurg Court : नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण

सिंधुदुर्ग - भाजपा आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात दाखल झाले आहेत. संतोष परब यांच्यावर हल्ला ( Santosh Parab Attack Case ) केल्याचा नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यांनी अटक पुर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता तो न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी पार पडली असून, नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांची मुदत दिली होती. त्या निर्णयावर आज नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण आले आहेत.

फेटाळला होता अटकपूर्व जामीन -

सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यासोबतच 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर राहण्याची मुदत दिली होती. त्यामुळे नितेश राणे आज जिल्हा न्यायालयासमोर हजर झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी आमदार नितेश राणे यांची बाजू मांडली होती.

जामीनाचा मार्ग नितेश राणे यांच्यासाठी बंद?

नितेश राणे हे कणकवली पोलीस ठाण्यांमध्ये तीन वेळा चौकशीला सामोरे गेले होते. संतोष परब हल्ला प्रकरणात पोलिसांना जी मदत माझी लागेल ते मी मदत करायला तयार आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर 10 दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर राहण्याची मुभा दिली होती. त्यामुळे नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हजर राहावे लागणार होते. अखेर ते आज हजर झाले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे कणकवलीत तळ ठोकून -

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कणकवलीत दाखल झाले असून कणकवली येथील आपल्या निवासस्थानी तळ ठोकून आहेत. सर्व परिस्थितीवर राणे लक्ष ठेवून असून कोर्टात नेमका काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

नेमकं काय झाले होते त्यावेळी -

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक इलेक्शन सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष परब हे मोटरसायकल वरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले.

काय आहे प्रकरण?

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर कणकवलीमध्ये जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील सचिन सातपुते या आरोपीचे आमदार नितेश राणे यांच्यासोबत फोनवरून कॉन्टॅक्ट होता. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणे यांना सह आरोपी करण्याची मागणी जिल्हा न्यायालयाकडे सरकारी वकिलांनी केली होती. तक्रारदाराने देखील आपल्या तक्रारीत आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांची नावे दिली होती. याप्रकरणी नवनिर्वाचित जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि आमदार नितेश राणे यांचे सचिव राकेश परब यांचे देखील नाव समोर आले होते. या सर्वांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण, या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत हवे आहेत, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत कोर्टाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

Last Updated : Jan 28, 2022, 12:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.