ETV Bharat / state

Nitesh Rane Bail Rejected: नितेश राणेंना दिलासा नाहीच, सिंधुदुर्ग कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

संतोष परब हल्ला प्रकरणात ( Santosh Parab Attack Case ) आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी ( Nitesh Rane Bail Rejected) न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग न्यायालयाने फेटाळला आहे.

नितेश राणे
नितेश राणे
author img

By

Published : Dec 30, 2021, 4:14 PM IST

Updated : Dec 30, 2021, 6:53 PM IST

सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात ( Santosh Parab Attack Case ) आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी ( Nitesh Rane Bail Rejected ) न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग न्यायालयाने फेटाळला आहे. याविरोधात नितेश राणे हे उद्या मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.

  • न्यायालयाबाहेर मोठा बंदोबस्त

भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात झालीय. थोड्यात वेळात याबाबत न्यायालय निर्णय देणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यात पोलीस फौजफाटा वाढवला

आमदार नितेश राणे हे अद्यापही जिल्ह्यात दाखल झाले नाहीत. त्यांचा शोध घेण्याकरिता जिल्हा पोलिसांचे ( Sindhudurg District Police ) पथक कालच गोवा आणि मुंबईत दाखल झाले आहे. आमदार नितेश राणे हे सोमवारी रात्री नारायण राणे ( Minister Narayan Rane ) यांना गोवा विमानतळावर ( Goa Airport ) भेटल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांना अटक झाल्यास जिल्ह्यातील वातावरण तापू शकते, हे लक्षात घेता जिल्ह्यात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कणकवली मध्ये पोलिस कुमक वाढविण्यात आली आहे.

  • शिवसेना - राणे समर्थक आमने सामने

दरम्यान, नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर निर्णय येणार असतानाच दुसरीकडे सिंधुदुर्गात राणे समर्थक व शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. कणकवलीत राणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे.

  • देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण

राज्यात दरोडेखोरांना पकडायला वेळ नाहीये. बलात्काऱ्यांना पकडायला वेळ नाहीये. सट्टा- पत्ता, दारू, सर्व अवैध धंदे सुरू आहेत. मात्र, या सरकारला नारायण राणे यांच्या घरी जाऊन नोटीस द्यायला वेळ ( Kankavli Police Notice To Narayan Rane ) आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आम्ही नारायण राणे यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे असल्याचे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जळगावात पत्रकारांशी बोलताना ( Devendra Fadnvis On Narayan Rane Notice ) सांगितले.

  • परिणाम भोगावे लागतील : मुनगंटीवार

भाजप आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ला प्रकरणात पोलीस शोधत आहेत. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगितले ( Kankavli Police Notice To Narayan Rane ) आहे. या घटनेचा समाचार घेताना, सरकारने आगीशी खेळ सुरू केला आहे व त्याचा अंजाम नक्कीच भोगावा लागेल असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी सांगितलं ( Sudhir Mungantiwar On Narayan Rane Notice ) आहे.

  • शिवसैनिकांचा जल्लोष

दरम्यान, आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसैनिकांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. अनेक ठिकाणी फटाके फोडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

Last Updated : Dec 30, 2021, 6:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.