सिंधुदुर्ग - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरातमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याच्या वृत्ताने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र ते शरद पवार आहेत, ते अमित शहा साहेबांना भेटले तर नवल काय ? त्यांनी मनात आणलं तर आज बाळासाहेबांचं स्मारक होत आहे त्या जागेवर ते राष्ट्रवादीचे कार्यालय करतील, असे ट्विट भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणेंनी केले आहे.
शरद पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुजरातमध्ये भेट घेतल्याचे वृत्त एका गुजराती दैनिकाने दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीच्या वृत्तानंतर राज्यात सत्ताबदल होणार का ? अशी चर्चा सुरू झाली असून, भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटले आहेत निलेश राणे?
“शरद पवार साहेब जर अमित शहा साहेबांना भेटले तर त्यात नवल वाटायचं कारण नाही. कारण शरद पवार साहेब कधी कोणाला भेटतील, याचा नेम नसतो. शरद पवार ते आहेत जे शिवाजी पार्कला स्व. बाळासाहेबांचे स्मारक होत आहे, त्या जागेवर ते एनसीपीचे कार्यालय देखील बनवू शकतात. असा टोला निलेश राणे यांनी ट्विटमधून लगावला आहे.
हेही वाचा - संसदेतील वाद आणि चर्चेचा खालवलेला दर्जा म्हणजे लोकशाही घसरण, व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली चिंता