सिंधुदुर्ग - जिल्ह्यात अत्यंत वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात रुग्णांची संख्या 38 झाली आहे. गेल्या 48 तासात 28 रुग्ण सापडले आहेत. यापैकी एकाच मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मुंबईहून चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. आज शुक्रवारी एका दिवसात 15 रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर काल गुरुवारी 13 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णाालयाकडे आज दुपारी कोरोना तपासणीचे 25 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 8 अहवाल पॉझिटिव्ह आले असून, 17 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील 1, हरकुळ बुद्रुक येथील 1, पियाळी येथील 1, सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी येथील 1, माडखोल 1, इगवेवाडी 1 तर वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी येथे 2 रुग्ण सापडले आहेत. या सर्वांचे स्वॅब दिनांक 22 मे रोजी घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत. संध्याकाळी आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण हा कुडाळ तालुक्यातील आहे.
काल गुरुवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे प्राप्त अहवालामधील 6 व्यक्तींना कोविडची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील बावशी येथील 1, कुडाळ तालुक्यातील कवठी येथील 1, वेगुर्लां तालुक्यातील मांतोंड येथील 1, सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील 1, देवगड तालुक्यातील वाडा येथील 1 व टेंबवली येथील 79 वर्षीय मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज अखेर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 39 झाली आहे. त्यापैकी 7 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाला असून 1 रुग्ण उपचारांसाठी मुंबई येथे गेला आहे. सध्याा जिल्ह्यात 30 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्या महिलेचा 23 मे रोजीच मृत्यू -
देवगड तालुक्यातील टेंबवली येथील ज्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिचा 23 मे रोजी मृत्यू झाला होता. ही महिला 19 मे रोजी मुंबई येथून जिल्ह्यात आली होती. 20 मे रोजी तिला रुग्णालयात दाखल करुन स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. या महिलेस उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा जुनाट आजार होता. 28 मे रोजी अहवाल प्राप्त झालेले सर्व रुग्ण मुंबई येथून जिल्ह्यात आलेले आहेत. आल्यापासून हे सर्व रुग्ण संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील शिवडाव, डामरे, वैभववाडी तालुक्यातील मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे आणि मेहबुब नगर, ब्राह्मणदेववाडी, आणि उंबर्डे, सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे, कुडाळ तालुक्यातील पणदुर, मयेकरवाडी, मालवण तालुक्यातील हिवाळे असे कंन्टेटमेंट झोन आहेत. संस्थात्मक अलगीकरणातील रुग्ण सापडलेल्या ठिकाणी कंन्टेटमेंट झोन करण्यात येणार नाही. ज्याठिकाणी रुग्ण गृह अलगीकरणात सापडले आहेत. त्या ठिकाणी कंन्टेटमेंट झोन करण्यात येणार आहेत.