ETV Bharat / state

माझ्यावर कुणीही दबाव आणू शकत नाही, पूर्ण विचार करूनच निलेश राणेंना उमेदवारी - नारायण राणे - नारायण राणे

नारायण राणेंवर भाजपचा दबाव असल्याची चर्चा सुरू आहे. या संबंधी वृत्तदेखील एका दैनिकाने प्रसिद्ध केले होते. मात्र, राणेंनी या सर्व चर्चा खोट्या असल्याचे सांगितले. तसेच पूर्ण विचार करून निलेश राणेंना उमेदवारी दिल्याचे स्पष्ट केले आहे.

खासदार नारायण राणे
author img

By

Published : Mar 22, 2019, 9:35 PM IST

सिंधुदुर्ग - निलेश राणेंना पूर्ण विचार करूनच उमेदवारी दिलेली आहे. कुणीही माझ्यावर दबाव आणू शकत नाही. काहीही झाले तरी निवडणूक लढवणारच. उमेदवारी मागे घेणे माझा पिंड नसल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

निलेश राणेंच्या उमेदवारीवर बोलताना खासदार नारायण राणे

नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे. तसेच राणे भाजपचे खासदार आहेत. असे असताना देखील नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग-रत्नागिरी मधून पुत्र निलेश राणे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नारायण राणेंवर भाजपचा दबाव असल्याची चर्चा सुरू आहे. या संबंधी वृत्तदेखील एका दैनिकाने प्रसिद्ध केले होते. मात्र, राणेंनी या सर्व चर्चा खोट्या असल्याचे सांगितले. तसेच पूर्ण विचार करून निलेश राणेंना उमेदवारी दिल्याचे स्पष्ट केले आहे.

निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या झेंड्यावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. हा मतदार संघ युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला सोडण्यात आलेला आहे. येथून शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे युतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे राणेंच्या स्वाभिमानने उमेदवार उतरवू नये. यासाठी भाजप नेतृत्वाकडून दबाव येत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, या सर्व चर्चा खोट्या असल्याचे राणे म्हणाले.

Intro:नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे. तसेच राणे हे भाजपचे संयोगी खासदार आहेत. असे असताना देखील नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग- रत्नागिरी मधून पुत्र निलेश राणे यांची उमेदवारी जाहीर केलेय. त्यामुळे नारायण राणेंवर भाजपचा दबाव असल्याची चर्चा सुरू आहे. या संबंधी वृत्त देखील एका दैनिकाने प्रसिद्ध केले होते. मात्र राणेंनी या सर्व चर्चांचा इन्कार केला आहे. तसेच पूर्ण विचार करून निलेश राणेंना उमेदवारी दिल्याचे स्पष्ट केले आहे. Body:निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या झेंड्यावर रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. हा मतदार संघ युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला सोडण्यात आलेला आहे. येथून शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे युतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे राणेंच्या स्वाभिमानने उमेदवार उतरवू नये म्हणून भाजप नेतृत्वाकडून दबाव येत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र नारायण राणे यांनी याचा इन्कार करत माझ्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही असे म्हटले आहे. मी पूर्ण विचार करून निलेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच काहीही झाले तरी निलेश राणे निवडणूक लढणारच. उमेदवारी मागे घेणे हा माझा पिंड नाही, असेही नारायण राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. Conclusion:बाईट: नारायण राणे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.