ETV Bharat / state

सिंधुदुर्ग : चाकूने भोसकून पत्नीची निर्घृण हत्या; आरोपी पतीला ग्रामस्थांनी ठेवले बांधून

दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर काजुळवाडी येथील क्रूरकर्मा पतीनेच आपल्या पत्नीची चाकू भोसकून निर्घृण हत्या केली. या  घटनेने सोमवारी दोडामार्ग हादरून गेला. घटनेनंतर पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी पतीला ग्रामस्थांनी झाडाला बांधून ठेवले. तसेच पोलिसांच्या स्वाधीन केले.

सिंधुदुर्ग येथे चाकू भोसकून पत्नीची निर्घृण हत्या
author img

By

Published : Aug 6, 2019, 7:46 AM IST

सिंधुदुर्ग- येथील दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर काजुळवाडी येथील क्रूरकर्मा पतीनेच आपल्या पत्नीची चाकू भोसकून निर्घृण हत्या केली. या घटनेने सोमवारी दोडामार्ग हादरून गेला. घटनेनंतर फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी पतीला ग्रामस्थांनी झाडाला बांधून ठेवले व नंतरपोलिसांच्या स्वाधीन केले.

दारू व जुगाराच्या व्यसनापायी आरोपीने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नम्रता ज्ञानेश्वर पेडणेकर (वय५३) असे मृत महिलेचे नाव आहे. तर ज्ञानेश्वर पेडणेकर असे आरोपीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडे आठच्या सुमारास उघडकीस आली. हत्या केल्यानंतर पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ग्रामस्थांनी पकडून झाडाला बांधून ठेवले. तसेच घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यावर आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले.

मृत नम्रता पतीच्या त्रासाला कंटाळून आपल्या माहेरी गोवा येथे राहत होती. सोमवारी नागपंचमीचा सण असल्याने ती रविवारी आपल्या सासरच्या घरी आली होती. बऱ्याच दिवसांनी पत्नी घरी आल्याने आरोपीने तिच्या बरोबर भांडण उकरून काढले. तसेच तिला आणि मुलाला घरातून बाहेर हाकलून दिले. त्यामुळे दोघांनीही रात्र घराबाहेरच काढली. दरम्यान सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास जवळील बोअरवेल वर नम्रता पाणी भरायला गेली. त्या ठिकाणी नम्रता ऐकटी असल्याचे पाहून आरोपी ज्ञानेश्वर याने तिला गाठले. तिच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर आरडाओरडा करत रक्तबंबाळ अवस्थेत नम्रताने घर गाठले. मात्र, तिथेच तीचा मृत्यू झाला.

दरम्यान आजूबाजूचे लोक तिच्या घरी जमा झालेले पाहून आरोपीने तेथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी त्याला पकडून त्याच्या घराच्या समोर असलेल्या झाडाला बांधून ठेवले. ग्रामस्थांनी तात्काळ घटनेची खबर दोडामार्ग पोलीसांना दिली. त्यामुळे पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन आरोपी ज्ञानेश्वर पेडणेकरला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, या हत्येच्या घटनेमुळे दोडामार्ग हादरुन गेले आहे.

Intro:सिंधुदुर्ग: पतीकडून पत्नीची चाकू भोसकून निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने सोमवारी दोडामार्ग हादरून गेला. घटनेनंतर पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी पतीला ग्रामस्थांनी झाडाला बांधून ठेवले. तसेच पोलिसांच्या स्वाधीन केले.Body:दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर काजुळवाडी येथील क्रूरकर्मा पतीनेच आपल्या पत्नीची चाकू भोसकून हत्या केली. दारू व जुगाराच्या व्यसनापायी त्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नम्रता ज्ञानेश्वर पेडणेकर ( वय ५३ ) असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव असून ज्ञानेश्वर पेडणेकर असे क्रूरकर्मा पतीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडे आठच्या सुमारास घडली. हत्या केल्यानंतर पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या पतीला ग्रामस्थांनी पकडून झाडाला बांधून ठेवले. तसेच घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यावर आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले.

मृत नम्रता पतीच्या त्रासाला कंटाळून आपल्या माहेरी गोवा येथे रहात होती. सोमवारी नागपंचमीचा सण असल्याने ती रविवारी आपल्या सासरच्या घरी आली होती. बऱ्याच दिवसांनी पत्नी घरी आल्याने आरोपीने तिच्या बरोबर भांडण उकरून काढले. तसेच तिला आणि मुलाला घरातून बाहेर हाकलून दिले. त्यामुळे दोघांनीही रात्र घराबाहेरच काढली. Conclusion:दरम्यान सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास जवळील बोअरवेल वर ती पाणी भरायला गेली. त्या ठिकाणी नम्रता ऐकटी असल्याचे पाहून आरोपी ज्ञानेश्वर याने तिला गाठले आणि तिच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर आरडाओरडा करत रक्तबंबाळ अवस्थेत तिने घर गाठले. मात्र तिथेच तीचा मृत्यू झाला. दरम्यान आजूबाजूचे लोक तिच्या घरी जमा झालेले पाहून आरोपीने तेथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी त्याला पकडून त्याच्या घराच्या समोर असलेल्या झाडाला बांधून ठेवले. ग्रामस्थांनी तात्काळ घटनेची खबर दोडामार्ग पोलीसांना दिली. त्यामुळे पोलीस निरीक्षक सुनील थोपटे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन आरोपी ज्ञानेश्वर पेडणेकर याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र या हत्येच्या घटनेमुळे दोडामार्ग हादरून गेला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.