सिंधुदुर्ग - मालवण तालुक्यात तंबाखू रस्त्यावर थुंकणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाला मालवण पालिका मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी चांगलीच अद्दल घडवली. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध असून याचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
मालवण मुख्याधिकारी जयंत जावडेकर तपासणी नाक्याजवळ गस्त घालत असताना बाजूने जाणाऱ्या एका वाहनातील तरुण रस्त्यावर तंबाखू खाऊन थुंकला. हा प्रकार मुख्याधिकारी जावडेकर यांनी पहाताच त्यांनी तरुणाला बोलावून घेत दंडात्मक कारवाई केली. सोबतच त्याच्याकडून थुंकलेली जागा साफ करून घेतली.