ETV Bharat / state

'ग्लोबल टेंडर भरणाऱ्या कंत्राटदाराला मुख्यमंत्री कार्यालयाने १२ टक्के कमिशन मागितले' - global tender

लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरमध्ये १२ टक्के कमिशन मुख्यमंत्री कार्यालयातून या ठेकेदाराकडे मागितले गेले. शेवटी तो ठेकेदार पळून गेला. यांना लसी खरेदी करून रुग्णांना बरे करायचे नसून हे पैसे कमवायला बसल्याचा आरोप भाजपा खासदार नारायण राणेंनी केला आहे.

भाजपा खासदार नारायण राणे
भाजपा खासदार नारायण राणे
author img

By

Published : May 27, 2021, 9:24 PM IST

सिंधुदुर्ग - राज्य सरकारच्या लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरवरून भाजप खासदार नारायण राणेंनी राज्य सरकारला फटकारले आहे. या टेंडरमध्ये १२ टक्के कमिशन मुख्यमंत्री कार्यालयातून या ठेकेदाराकडे मागितले गेले. शेवटी तो ठेकेदार पळून गेला. यांना लसी खरेदी करून रुग्णांना बरे करायचे नसून हे पैसे कमवायला बसल्याचा आरोप भाजपा खासदार नारायण राणेंनी केला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने कंत्राटदाराला मागितले 12 टक्के कमिशन

पोलीस हाऊसिंगच्या प्रोजेक्ट्मध्ये १५ कोटी रुपये एका अधिकाऱ्याने मागितले

भाजपा नेते नारायण राणे यांनी आज (गुरुवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चक्रीवादळानंतरच्या कोकण दौऱ्यावरही टीका केली. मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन काय पाहिले असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. तर राज्य सरकारच्या लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरवरून भाजपा खासदार नारायण राणेंनी थेट मुख्यमंत्री कार्यालयातून कमिशन म्हणून टेंडर भरणाऱ्या ठेकेदाराकडून १२ टक्के कमिशन मागितले गेल्याचा आरोप करण्यात आला. तर पोलीस हौऊसिंगच्या इमारत बांधकाम प्रोजेक्ट्मध्ये १५ कोटी रुपये एका अधिकाऱ्याने मागितले असल्याचे ते यावेळी म्हणाले.

'मराठा समाज्याला आरक्षण द्यावे या मताचे ठाकरे नाहीत'

खासदार संभाजीराजे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवरून भाजपाचे खासदार नारायण राणेंनी राज यांना चिमटे काढले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आता हे मुख्यमंत्र्यांना सांगणार का, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार गंभीर नाही. ज्यांनी खासदारकी दिली त्यांच्यासंदर्भात असे विधान करणे, मराठा समाजाला भाजपाने आरक्षण दिले. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी काय केले?. मराठा आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकार किती गंभीर आहेत. स्वतः उद्धव ठाकरे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मताचे नसल्याचा आरोप नारायण राणेंनी केला.

भाजपाकडून नवा प्रस्ताव -

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजपचे नेते राज्याचा दौरा करत आहेत. सरकारने आता जो प्रस्ताव पाठवायचा आहे, तो अभ्यासपूर्ण असला पाहिजे. त्यासाठी चांगले वकिल आणि सुप्रीम कोर्टाने नाकारलेले मुद्दे आहे. त्याला धरून योग्य प्रस्ताव गेला पाहिजे. तसा प्रस्ताव भाजपा तयार करत आहे. त्यासाठी भाजपाने काही वकिलांची नेमणूक केली असल्याची माहिती भाजपाचे खासदार नारायण राणेंनी दिली आहे. भाजपाकडून या संदर्भातील प्रस्ताव सादर करून विरोधीपक्षनेते मुख्यमंत्र्यांकडे हा प्रस्ताव सादर करतील, अशी माहिती नारायण राणेंनी पत्रकार परिषदे दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.