सिंधुदुर्ग - जिल्ह्यात एकूण 16 हजार 378 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्यापैकी 515 व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. शिवाय गावपातळीवर 15 हजार 863 व्यक्तींना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 307 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 142 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 16 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 1 हजार 126 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 165 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 85 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 52 रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये, 33 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आत्तापर्यंत 4 हजार 996 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सहाव्या रुग्णाच्या संपर्कातील 4 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित असून इतर सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सातव्या आणि आठव्या रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. 2 मेपासून आज अखेर एकूण 36 हजार 628 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये खारेपाटण चेकपोस्ट येथून 26 हजार 935, फोंडा – 1 हजार 963, करुळ – 3 हजार 320, आंबोली – 1 हजार 587, बांदा – 1 हजार 740, दोडामार्ग – 783 व्यक्तींनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे.