सिंधुदुर्ग - खासगी प्रकल्प असलेल्या चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न देता त्याऐवजी मुबंई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी मनसेने केली आहे. कणकवली मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर बोलत आहे. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, शैलेश नेरकर आदी उपस्थित होते.
राणेंनी केली होती शिवसेना संपविण्याची भाषा
राणे व त्यांच्या पुत्रांनी सात्यतानी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली. शिवसेना संपविण्याची भाषा केली. त्यावेळी जिल्ह्यात आम्ही राणेंशी लढलो, आम्ही राहिलो नसतो तर आताची शिवसेना राहिली नसती. आता पुतण्या-मावशीच्या प्रेमाप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा आग्रह करत आहे. राणेंनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्यासाठी भाषा केली. त्यांच्या मोठ्या मुलाने बाळासाहेबांबद्दल काही वक्तव्य केल्याने राणेंना माफी मागावी लागली. राणे कुटुंबातील लोकांना बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोलायचा अधिकार नसल्याचे यावेळी परशुराम उपरकर म्हणाले.
सत्ताधारी अन् विरोधक नामांतरावरुन करताहेत श्रेय लाटण्याचा प्रयत्न
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधारी व विधानसभेतील विरोधी पक्ष नामांतरावरून श्रेयवाद करत आहेत. हे चिपी विमानतळ किती दिवस चालेल? त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणे किती योग्य आहे? लातूर, नाशिक, कोल्हापूर ही विमानतळे यापूर्वीच बंद पडली आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी जनसामान्यांसाठी काम केले होते. त्यांच्याच स्वप्नातून झालेल्या मुबंई-पुणे या मार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले पाहिजे होते. आता मुंबई-गोवा महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली.
हेही वाचा - गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही; आमदार वैभव नाईकांनी साधला नितेश राणेंवर निशाणा
हेही वाचा - आम्ही दोन दिवसांचे तरी अधिवेशन घेतले, केंद्राने काय केले? मंत्री सामंताचा भाजपावर निशाणा