ETV Bharat / state

कुडाळ बसस्थानकात मनसेचे 'क्रिकेट खेळो' आंदोलन

गांधीचौक येथील नवीन बसस्थानकाचे अद्याप लोकार्पण न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप, महाराष्ट्र नवनिर्माण एसटी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. हे बसस्थानक लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करावे अशी मागणी जे.डी. ऊर्फ बनी नाडकर्णी यांच्या वतीने करण्यात आली आहे.

MNS agitation Kudal
कुडाळ बसस्थानकात मनसेचे 'क्रिकेट खेळो' आंदोलन
author img

By

Published : Nov 30, 2020, 10:40 PM IST

सिंधुदुर्ग - गांधीचौक येथील नवीन बसस्थानकाचे अद्याप लोकार्पण न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप, महाराष्ट्र नवनिर्माण एसटी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. हे बसस्थानक लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करावे अशी मागणी जे.डी. ऊर्फ बनी नाडकर्णी यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी नाडकर्णी यांनी बसस्थानक परिसरात क्रिकेट खेळो आंदोलन केले. अडीच कोटीचे बसस्थानक, की गुरांचा गोठा? असा संतप्त सवालही नाडकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

बनी नाडकर्णी यांच्यासह मनसे जिल्हाध्यक्ष धिरज परब, राजन दाभोलकर, एसटी संघटना जिल्हाध्यक्ष राजू कासकर, अनिल केसरकर, मालवणचे गणेश वाईरकर, कणकवली तालुका सचिव संतोष कुडाळकर, रमाकांत नाईक, सिद्धेश खुटाळे हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते.

बसस्थानकाचे लोकार्पण झाले नसल्याने प्रवाशांची गैरसोय

या बसस्थानकाच्या चुकीच्या कामाबाबत मनसेने वेळोवेळी आवाज उठवला आहे. सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून बसस्थानक उभारण्यात आले. मात्र अद्यापही त्याचे लोकार्पण करण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसस्थानक आवारात सायंकाळच्या वेळी मच्छीमार्केट भरत आहे. गुरे ठाण मांडून बसत आहेत. खासगी वाहने पार्क करण्यात येत असून, बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले असल्याचे नाडकर्णी यांनी यावेळी म्हटले. दरम्यान आज या ठिकाणी क्रिकेट खेळो आंदोलन करण्यात आले आहे. जर तातडीने लोकापर्ण केले नाही तर मनसेच्या स्टाईने उत्तर दिले जाईल असा ईशाराही यावेळी देण्यात आला.

प्रशासनाकडून आंदोलनाची दखल

बनी नाडकर्णी हे सातत्याने कुडाळच्या प्रश्‍नांसाठी आवाज उठवत आहेत. 15 दिवसांपूर्वी त्यांनी या ठिकाणी क्रिकेट खेळणार असल्याचे जाहीर करून, आज क्रिकेट खेळो आंदोलन केले. दरम्यान या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली असून, आगारप्रमुख सुजित डोंगरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तातडीने या बसस्थानकाचे लोकापर्ण करण्यात येईल असे आश्ववासन त्यांनी आंदोलकांना दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.