सिंधुदुर्ग - 'जिल्हा परिषदेला निवडून न येऊ शकणाऱ्या प्रमोद जठारांना उत्तर देणे योग्य नाही. त्यांच्यावर मी बोलणे म्हणजे त्यांना मोठा राजकीय नेता करण्यासारखे आहे. माझ्यावर देवेंद्र फडणवीस, अमित शहा किंवा नारायण राणे यांनी टीका केली असती तर, मी उत्तर दिले असते', असा टोला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाजपा नेते प्रमोद जठार यांना लगावला आहे. ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत उदय सामंत यांनी जठार यांच्यावर टीका केली आहे.
'जठार यांनी एखादा नगरपरिषद गट पकडावा, तिथे उभे राहावे, निवडून यावे. पक्षातील नेत्यांची मर्जी जिंकावी, असा सल्ला मी मित्र म्हणून जठार यांना देतो, असेही सामंत म्हणाले. कोणी ऐरागैरा बोलल्यावर मी उत्तर देणे योग्य नाही, अस टोलाही सामंत म्हणाले.
काय म्हणाले होते जठार?
उदय सामंत हे उपरे पालकमंत्री आहेत. त्यांना सिंधुदुर्गाच्या प्रश्नांची जाण नाही. कॅबिनेट मंत्री असतानाही त्यांनी जिल्ह्यासाठी काहीच केले नाही. आम्ही जिल्ह्यात अनेक दिवसांपासून कोरोना टेस्टिंग लॅबची मागणी करीत होतो. मात्र, जिल्ह्याासाठी टेस्टिंग लॅबही मंजूर केली नाही, असा आरोप प्रमोद जठार यांनी केला होता.
उदय सामंत यांची विशेष मुलाखत इथे पाहा -