ETV Bharat / state

सिंधुदुर्गात मंत्री विजय वडेट्टीवार यांचा निषेध; मराठा समाज आंदोलक ताब्यात

author img

By

Published : May 22, 2021, 9:53 AM IST

Updated : May 22, 2021, 12:24 PM IST

कडक पोलीस बंदोबस्त असतानाही मराठा समाजाचे कार्यकर्ते याठिकाणी दाखल झाले. आणि त्यांनी मंत्री वडेट्टीवार यांच्या निषेधाच्या घोषणा द्यायला सुरवात केली. यानंतर पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

मराठा समाज
मराठा समाज

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात चक्रीवादळग्रस्थ भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार शुक्रवारी जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यांच्या निवासाची व्यवस्था असलेल्या ओरोस शासकीय विश्रामगृहावर काही मराठा आंदोलकांनी वडेट्टीवार यांचा निषेध करत घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या ३० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

सिंधुदुर्गात मंत्री विजय वडेट्टीवार यांचा निषेध

आंदोलकांवर पोलिसांची दमदाटी
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलक वडेट्टीवारांच्या निवास व्यवस्थेठिकाणी जमा झाले होते. घोषणाबाजीनंतर पोलिसांनी ३० आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलकांवर पोलिसांनी दमदाटी केल्याने मराठा समाजाचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत मंत्री वडेट्टीवार यांचा निषेध व्यक्त केला. त्यावेळी उपस्थित अँड सुहास सावंत, पणदूर सरपंच दादा साईल, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब आणि इतर मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बंदोबस्त असतानाही मराठा समाजाचे कार्यकर्ते दाखल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री विजय वडेट्टीवार यांचा आज (शनिवारी) नुकसानग्रस्थ भागाच्या पाहणीचा दौरा आहे. त्यांचे शुक्रवारी सायंकाळी उशिरा जिल्ह्यात आगमन झाले. त्यांचा निवासाची व्यवस्था ओरोस शासकीय विश्रामगृहावर करण्यात आली आहे. याठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त असतानाही मराठा समाजाचे कार्यकर्ते याठिकाणी दाखल झाले. आणि त्यांनी मंत्री वडेट्टीवार यांच्या निषेधाच्या घोषणा द्यायला सुरवात केली. यानंतर पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

मंत्री वडेट्टीवार यांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न
ओबीसी समाजामधे मराठा समाजाचा समावेश नको असे विधान मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्याने त्यांचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटल्याचे दिसून येत आहे. यावेळी बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक अँड सुहास सावंत म्हणाले. मराठा आरक्षणाच्या विषयाला मंत्री वडेट्टीवार यांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही घटनेच्या चौकटीत राहूनच आरक्षण मागत आहोत. यावेळी वडेट्टीवार यांचा पोलीस बंदोबस्त असतानाही आम्ही या ठिकाणी येऊन निषेध केला आहे. त्यामुळे या पुढच्या काळात कोणत्याही मंत्र्याने, असे वक्तव्य केल्यास याच पद्धतीने त्यांना उत्तर दिले जाईल. तर यापुढची आंदोलनाची दिशाही खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या सूचनेनुसार ठरेल, असेही ते म्हणाले.

Last Updated : May 22, 2021, 12:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.