ETV Bharat / state

तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही; वादळवाऱ्यासह पाऊस बरसणार

तौक्ते चक्रीवादळ
तौक्ते चक्रीवादळ
author img

By

Published : May 15, 2021, 11:31 AM IST

Updated : May 16, 2021, 6:49 AM IST

01:36 May 16

मुंबईत अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी

मुंबई - अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे शनिवारी मध्यरात्री ढगांच्या गडगडाटासह मुंबई महानगर प्रदेशातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली. दिवा परिसरालाही पावसाचा फटका बसला. दरम्यान, रविवारीही शहर व उपनगरांत जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

01:31 May 16

पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

पुणे -  शनिवारी रात्रीच्या सुमारास पुण्यात वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने 11 झाडांची पडझड झाली आहे. यादरम्यान, कोणतीही जिवीतहानी झाली नसून अग्निशमन दलातर्फे सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

01:11 May 16

  • मुंबई - पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर तसेच शहर विभागात रात्री 11 दरम्यान पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. या कोणतेही नुकसान झाले नाही.

00:13 May 16

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे - उदय सामंत

रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जे नियम दिले आहेत, त्यांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. निसर्ग वादळाचा अनुभव आपल्याकडे असल्याने आपण सर्वांनी जबाबदारीने प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, स्वतःहून स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहनही उदय सामंत यांनी केले. 

20:49 May 15

कोकणात चक्रीवादळ धडकणार नाही; पण सिंधुदुर्ग, रत्नागिरीत दिसणार प्रभाव

मुंबई - अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर तौक्ते चक्रीवादळात झाले आहे. हे चक्रीवादळ गोवा किनारपट्टीपासून 250 किलोमीटर लांब आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा किनारपट्टी भागात जास्त असणार आहे. कारण या भागातूनही चक्रीवादळ जाणार असून, महाराष्ट्रात हे चक्रीवादळ कुठेही धडकणार नसल्याची माहिती हवामान तज्ज्ञ शुभांगी भुत्ते यांनी दिली आहे.

19:50 May 15

तौक्ते चक्रीवादळ परिस्थितीत राज्याला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणार - निधी चौधरी

रायगड - 16 आणि 17 मे रोजी रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनारी तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. राज्यात ऑक्सिजन वितरण करण्यात जिल्हा सक्रिय असल्याने वादळसदृश्य परिस्थितीतही राज्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेतली गेली आहे. 48 तास पुरेल इतका ऑक्सिजन साठा जिल्ह्यात उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे. वादळामुळे अतिवृष्टी आणि वारे वाहून वीज जाण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील आयसीयू कोविडं सेंटरमध्ये दोन जनरेटर उपलब्ध ठेवण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच राज्यात ऑक्सिजन वितरण करण्यास कोणती अडचण येऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम,नॅशनल हायवे विभाग यांनाही सूचना देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

19:18 May 15

मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यांवर अलर्ट जारी, आढावा बैठक संपली

मुंबई -  तौक्ते चक्रीवादळाबाबत मुंबई महापालिकेची आढावा बैठक संपली आहे. महापालिका आयुक्त, सर्व सहायक आयुक्त, NDRF चे वरिष्ठ अधिकारी आणि शहर आणि उपनगर जिल्हा आपतकालीन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नौदल अधिकारी या बैठकीत हजर होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली.  

मुंबईत आज तासी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत, तर उद्या 60 ते 70 तासी किलोमीटर वेगाने वारे वाहणार  आहेत. तसेच सर्व यंत्रणा सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत कोविड सेंटरला पर्यायी विद्युत व्यवस्था करण्याचे आदेश व गरज असेल तर रुग्ण दुसरीकडे हलवले जातील, असे आदेश देण्यात आले आहेत.

19:01 May 15

रायगड किनारपट्टीवर ६२, तर खाडीवरील ११५ गावांना सतर्कतेचा इशारा

रायगड - जिल्ह्यातील किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळाच्या परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि सखल भागातील नागारिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यांतील ऑक्सिजन प्रकल्पाची विशेष काळजी घेतली जाणार आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांची शक्यता लक्षात घेऊन सर्व १५ तालुक्यात आपत्ती निवारण कक्ष २४ तासांसाठी सुरु ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावरील ६२ गावे, तर खाडी किनाऱ्यांवरील ११५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

18:19 May 15

कोल्हापुरातील गांधीनगर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस

कोल्हापूर - गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळातून नागरिक सावरताहेत तोच आता तौक्ते चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातच्या काही भागांना या चक्रीवादळाचा फटका बसणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा अलर्ट जारी करण्यात आला असून, वादळाचे परिणाम दिसू लागले आहेत. सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. गांधीनगर बाजारपेठ आणि आजूबाजूच्या परिसरात आज सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.  

17:25 May 15

तौक्ते चक्रीवादळ काही तासात मुंबईत धडकणार

मुंबई - मुंबईत येत्या काही तासात तौक्ते चक्रीवादळ मुंबईत धडकणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिका, अग्निशामक दल सज्ज झाले आहे. अग्निशामक दलाच्या मदतीसाठी एनडीआरएफचीही मदत घेण्यात आली आहे. आज रात्री किंवा उद्या रविवारी सकाळपर्यंत तौक्ते  चक्रीवादळ मुंबईत येईल. त्यावेळी 60 ते 70 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.  

17:18 May 15

तौक्ते चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ सज्ज

माहिती देताना कमांडर अनुपम श्रीवास्तव

पुणे - तौक्ते चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) सज्ज असल्याची माहिती कमांडर अनुपम श्रीवास्तव यांनी दिली. एनडीआरएफची तीन पथके मुंबईत तैनात करण्यात आली आहेत, तर, शुक्रवारी रात्रीच एक पथक गोव्यात दाखल झाले. तर, इतर 14 पथके पुणे मुख्यालयात सज्ज आहेत. ही 14 पथके प्रशासनाकडून आदेश मिळताच कुठल्याही भागात कमी कालावधीत पोहचू शकतात.

17:12 May 15

असा असेल तौक्ते चक्रीवादळाचा प्रवास

Cyclone Tauktae
असा असेल तौक्ते चक्रीवादळाचा प्रवास

मुंबई - तौक्ते चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातच्या काही भागांना या चक्रीवादळाचा फटका बसणार आहे.  

16:28 May 15

मुंबईतील परिस्थितीचा प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

मुंबई - तौक्ते चक्रीवादळ मुंबईपासून अवघ्या 250 किलोमीटर अंतरावर आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी हे वादळ मुंबईच्या समुद्र किनारी धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारी भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत.  

16:11 May 15

मुंबईतील समुद्र किनारी ९३ लाईफगार्डची नियुक्ती

मुंबई - हवामान खात्याने तौते वादळासंदर्भात यलो अलर्ट जाहीर केला आहे. या अनुषंगाने मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. समुद्रकिनारी आणि समुद्र किनाऱ्या लगतच्या विभागात विशेष काळजी घेतली जात आहे. समुद्र किनारी ९३ लाईफगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच समुद्र किनाऱ्या जवळ तसेच चौपाट्याजवळच्या मुंबई अग्निशमन दलाच्या केंद्रांना अलर्टवर ठेवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

14:58 May 15

केरळमधील कासारगोड येथे मुसळधार पाऊस, दुमजली इमारत कोसळली

कासारगोड - केरळमधील कासारगोड जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस अद्यापही सुरू आहे. चेरंगी किनारपट्टी भागात सतत पाऊस पडत आहे. कासारगोड येथील रहिवासी दुमजली इमारत कोसळली आणि समुद्राच्या भरतीमुळे ती वाहून गेली आहे. घटनेपूर्वी या इमारतीमधील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.  

14:22 May 15

सिंधुदुर्गच्या देवगड बंदरात गोवा व कर्नाटकातील शेकडो मच्छिमार नौका आश्रयाला

सिंधुदुर्ग - 'तौक्ते’ चक्रीवादळ गोव्यापासून अजून ३५० किमी लांब असून हे वादळ गोवा-सिंधुदुर्गच्या दिशेने ५० ते ६० कि.मी. प्रतितास वेगाने सरकत आहे. या वादळातून बचावासाठी कर्नाटक आणि गोवा राज्यातील शेकडो मच्छिमार नौका सिंधुदुर्गच्या देवगड बंदरात आश्रयाला आल्या आहेत. तर विजयदुर्ग बंदरातही नौकांना आश्रय देण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. गोव्यात एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. दरम्यान गोव्यात १ जूनपासून मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. गोव्यापासून वादळ अजून ३५० किमी लांब आहे. गोवा-सिंधुदुर्गात वाहणार ८० ते ९० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 

14:12 May 15

वादळाच्या पार्श्वभूमीवर शेकडो नौका बंदरात विसावल्या

शेकडो नौका बंदरात विसावल्या

रत्नागिरी - तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, तसेच समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकांनी किनाऱ्यावर परतावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. त्यानुसार शेकडो नौका जिल्ह्यातील विविध बंदरात विसावल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून मच्छिमारांना व किनारपट्टीलगत राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा संदेश देण्यात आला होता. तसेच मच्छीमारांनी सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणच्या बंदरांचा आसरा घेतला आहे. जिल्ह्यातील प्रमुख बंदरांवर सध्या मासेमारी नौकांनी गर्दी केली आहे. वादळाच्या सतर्कतेचा संदेश मिळाल्याने हर्णे बंदरातील नौकांनी आंजर्ले, जयगड, दाभोळ (रत्नागिरी), दिघी (रायगड) खाडीत तसेच मिरकरवाडा व अन्य बंदरात आसरा घेतला आहे. रत्नागिरीतील नौकांनी देखील सुरक्षिततेसाठी बंदरातच राहणे पसंत केले आहे. मिरकरवाडा बंदरात जवळपास 500 नौका सुरक्षित करून ठेवण्यात आल्या आहेत.

14:12 May 15

मुंबईत यलो अलर्ट जाहीर; समुद्रकिनारी, चौपाट्यांजवळ अग्निशमन दलासह ९३ लाईफगार्ड सज्ज

मुंबई - हवामान खात्याने तौत्के वादळासंदर्भात यलो अलर्ट जाहीर केला आहे. या अनुषंगाने मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. समुद्रकिनारी आणि समुद्र किनाऱ्या लगतच्या विभागात विशेष काळजी घेतली जात आहे. समुद्र किनारी ९३ लाईफगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच समुद्र किनाऱ्या जवळ तसेच चौपाट्याजवळच्या मुंबई अग्निशमन दलाच्या केंद्रांना अलर्टवर ठेवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच पालिका 'एनडीआरएफ'ची मदत घेणार आहे. 

12:50 May 15

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुलुंड जम्बो कोविड सेंटर मधील 100 पेक्षा जास्त रुग्ण हलवले

मुलुंड जम्बो कोविड सेंटर मधील 100 पेक्षा जास्त रुग्ण हलवले

मुंबई - चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्वच कोविंड सेंटरला अलर्ट जारी केला आहे. या वादळात दरम्यान सुटणारे वारे आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्ण दगावू नयेत यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश या सर्व सेंटरला देण्यात आले आहेत. त्यानुसार आता सर्वच सेंटर्समध्ये आपत्कालीन उपाययोजना सुरुवात करण्यात आली आहे. मुलुंड जम्बो कोविड सेंटरमधील 100 पेक्षा जास्त रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यास सुरूवात केली आहे. या भागातील जवळील एमटी अग्रवाल, राजावाडी, मुलंड, मिठागर कोविड सेंटर, भाभा रुग्णालय या ठिकाणी या रुग्णांना हलवण्यात आलेला आहे. त्याबरोबर ज्या रुग्णांना अति दक्षता विभागात भरती करण्यात आलेल्या अशा रुग्णांसाठी मुलुंड अक्ट्राय नाका येथील आयसीयू युनिट हे तयार करुन ठेवण्यात आलेला आहे.

12:44 May 15

मुंबईतील बीचवर 100 लाईफगार्ड तैनात, यंत्रणा सज्ज - किशोरी पेडणेकर

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वेगवेगळ्या बीचवर 100 लाईफगार्डस तैनात करण्यात आल्याची माहिती, महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. अग्निशमन दलाच्या टीमही सज्ज असून वांद्रे-वरळी सी लिंक आज आणि उद्या वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. सर्व जम्बो कोविड सेंटरनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून गरज पडल्यास रुग्णांना इतरत्र हलविण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे त्या म्हणाल्या. दुपारनंतर यासंदर्भातील अपडेटस समोर येतील. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्या म्हणाल्या.

12:14 May 15

गोव्यात एनडीआरएफची टीम दाखल

गोव्यात एनडीआरएफची टीम दाखल

रत्नागिरी - तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळाचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. गोव्याच्या समुद्र किनारी धोक्याचा लाल निशाण लावण्यात आला आहे. तर पुण्यातून गोव्यात एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे.

11:43 May 15

रायगड जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणा सतर्क

रायगड - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तौक्ते चक्रीवादळ निर्माण झाले आहे. कर्नाटकमधून हे वादळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात धडकले आहे. रायगडाच्या समुद्रात 16 मे रोजी सायंकाळपर्यंत धडकणार असल्याचे जिल्हा आपत्ती प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तर मच्छीमार बांधवानाही समुद्रात जाण्यास बंदी घातल्याने हजारो बोटी समुद्रकिनारी लागलेल्या आहेत.

11:29 May 15

कर्नाटकात काही ठिकाणी पाऊस

तौक्ते वादळामुळे कर्नाटकमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी वादळाच्या पार्श्वभूमीवर पाऊसही झाला.

11:29 May 15

केरळमध्ये मुसळधार पाऊस

तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर केरळच्या मलप्पूरममध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमधील मलप्पूरम जिल्ह्यासह राज्यातील काही भागात जोरदार अतिवृष्टीही बघायला मिळाली.

11:28 May 15

ओडिशाहून एनडीआरएफची पथके गुजरातला रवाना

LIVE UPDATES about cyclone Tauktae in arabian sea
ओडिशाहून एनडीआरएफची पथके गुजरातला रवाना

तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशाहून एनडीआरएफची पाच पथके गुजरातला रवाना झाली आहे. भूवनेश्वर विमानतळावरून तिसऱ्या मुंडुली बटालियनची ही पथके गुजरातला रवाना झाली आहेत.

11:05 May 15

रत्नागिरीत समुद्र खवळलेला, सकाळपासून ढगाळ वातावरण

रत्नागिरीत समुद्र खवळलेला

रत्नागिरी - तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळाचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यातच समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वातावरण ढगाळ असून विजा चमकत असल्याचं रात्रीचं चित्र होतं. अद्याप देखील सुर्यनारायणाचं दर्शन झालेलं नसून समुद्रामध्ये हळूहळू लाटा उसळत आहेत. पुढील दोन दिवस कोकणकरता महत्त्वाचे असून निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव पाहता चक्रीवादळाचं संकट टळू दे अशी अपेक्षा सध्या प्रत्येक कोकणवासी बोलून दाखवत आहे. तसेच या वादळाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे.

10:57 May 15

'तौक्ते' वादळाचे संकट..

मुंबई - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम देखील जाणवू लागला आहे. वादळाचा प्रवास गोवा सिंधुदुर्गच्या दिशेने सुरू झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्यातील सासष्टी, सांगे आणि केपेसह इतर सर्व तालुक्यांना रात्रभर पावसाने झोडपले. दरम्यान रात्री गोव्यातील म्हापसे मध्ये एका नारळाच्या झाडावर वीज पडल्याने हे झाड जळत होते. दरम्यान गोव्याच्या समुद्र किनारी धोक्याचा लाल निशाण लावण्यात आला आहे. तर पुण्यातून गोव्यात एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईसह उपनगरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

मुंबईत वाऱ्यासह तुरळक सरी -

मुंबई काल रात्री पासूनच या चक्रीवादळाचा परिणाम जाणवू लागला होता. पूर्व, पश्चिम, मुंबई शहर या भागात गार वारा सुटला होता. त्यानंतर काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत. ठगाळ वातावरणामुळे आज (शनिवार) सकाळी मुंबईकरांना सूर्य दर्शनही झाले नाही.

कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जारी -

लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. गुजरातच्या दिशेने हे चक्रीवादळ सरकत आहे. यामुळे येत्या 12 तासात चक्रीवादळ अधिक सक्रीय होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच काही भागात ऑरेंज झोनही जारी करण्यात आला आहे.

आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क -

बृहन्मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज व सतर्क असून या यंत्रणेस हवामान खात्याकडून प्राप्त अंदाज व चक्रीवादळाबाबतच्या सूचना व सतर्कतेचे संदेश सर्व संबंधितांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार नौदल, तटरक्षक दल, थलसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक यांची मदत आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्याची कार्यवाही देखील आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे.

मच्छिमारांना इशारा -

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, समुद्रात जाऊ नये असे निर्देश देण्यात आल्याचे प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी सांगितले.

वेगवान वारे वाहण्याची शक्यतान -

१५ मे रोजी कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्याला या वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर १६ व १७ मेला मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील काही भागात अति मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, मुंबई ठाणे रायगड पालघर भागात ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, या भागांसाठी 'यलो अलर्ट' जारी केल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

Last Updated : May 16, 2021, 6:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.