सिंधुदूर्ग - शासनाने नुकसान भरपाईची घोषणा केली होती. पण, अद्याप मदत निधी मिळाली नाही. स्थानिक आमदारांनी भेटी दिल्या पण, आश्वासन देऊन निघून गेले. आता कोरोनामुळे मच्छीमारी बंद आहे. त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे लाचारीत जगण्यापेक्षा कोरोनामुळे मेल्यानंतर आनंद होईल, अशी भावना मच्छिमारांनी व्यक्त केली.
कोरोनाचा फटका सर्व क्षेत्राला बसत आहे. यामुळे सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 80 ते 90 टक्के मासेमारी बंद झाली आहे. त्यामुळे साधारण 35 ते 40 हजार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या क्यार वादळात जिल्ह्यातील मच्छीमारांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप कोणत्याही मच्छीमाराला नुकसान भरपाई मिळालेली नाही. क्यारमधून सावरत असतानाच कोरोनाने आघात केल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत.
हेही वाचा - कणकवलीत आढळला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण