ETV Bharat / state

Sindhudurg - गाळेलमध्ये डोंगर कोसळला, ढिगाऱ्याखाली दुचाकीस्वार दबल्याची भीती - गाळेलमध्ये डोंगर कोसळला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या गाळेल-सटमटवाडी येथे डोंगराचा काही भाग कोसळला आहे. त्यात वेगुर्ले येथील दुचाकी चालक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Sindhudurg
Sindhudurg
author img

By

Published : Jul 24, 2021, 5:18 PM IST

सिंधुदुर्ग - महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी डोंगर कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय या दुर्घटनांमध्ये अनेकांचा जीवही गेला आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या गाळेल-सटमटवाडी येथे डोंगराचा काही भाग कोसळला आहे. त्यात वेगुर्ले येथील दुचाकी चालक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना शुक्रवारी (23 जुलै) सकाळी घडली आहे. 24 तासानंतर मदतकार्याला सुरवात झाली आहे.

गाळेलमध्ये डोंगर कोसळला,

डोंगर कोसळला, तरूण अडकल्याची भीती -

शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गाळेल-सटमटवाडी या मार्गावरून वेंगुर्ले येथील मोटारसायकलस्वार गोव्याच्या दिशेने जात होता. यावेळी अचानक हा डोंगर कोसळला. त्याखाली तो दबला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

तो तरुण गोव्याला जात होता नोकरीसाठी -

वेंगुर्ले येथील हा तरुण नोकरीनिमित्त गोवा येथे जात होता. पुरामुळे बंद असलेले मार्ग, प्रशासनाने कोविड प्रादुर्भावामुळे घातलेले निर्बंध, मुख्य मार्गावर बसवलेली तपासणी पथके यांना चुकवून हा तरुण कामावर पोहोचण्यासाठी या छुप्या मार्गाने जात होता. यावेळी ही दुर्घटना घडली.

दोघांनी कार सोडून काढला पळ

हा डोंगर कोसळत असताना या ठिकाणाहून एक चारचाकी कारही जात होत होती. डोंगर कोसळत असताना या कारमधील दोघांनीही कोसळणारा डोंगर पाहण्यासाठी कार थांबविली. मात्र, डोंगराच्या मातीचा वेग लक्षात घेता कार तिथेच टाकून आपला जीव वाचविण्यासाठी त्यांनी पळ काढला. यामुळे या दोघांचाही जीव वाचला. पण, त्यांची होंडा अमेझ कार मातीखाली गाडली गेली आहे.

24 तासाने मदतकार्य सुरू -

घटना घडल्यानंतर 24 तासांनी या ठिकाणी आज (24 जुलै) जेसीबीच्या सहाय्याने माती हटविण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात माती आणि त्यात पाऊस असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत. प्रशासनाची मदत अजून पोहोचली नाही, तर खासगी स्वरूपात जेसीबी आणून मदत केली जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

हेही वाचा - कोकणासह अतिवृष्टीबाधित भागातून 90 हजार लोकांना जीवदान, 890 गावांना फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.