सिंधुदुर्ग - कणकवलीतील नागरिक आणि नगरपंचायतीने जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी या कर्फ्यूला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे कणकवलीत राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर कणकवलीत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आतापर्यंत कणकवली तालुक्यात 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, कोरोनाबाधितांची संख्याही कणकवली शहरात सर्वाधिक आहे. लोकांना अत्यावश्यक सेवा मिळाव्यात याची व्यवस्था केली असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले. कणकवलीत जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर काल चढ्या भावाने भाजीविक्री केली गेली.