ETV Bharat / state

'तिलारी' बोटीतून पर्यटकांना करता येणार जंगल सफारी - तिलारी जंगल सफारी बोट न्यूज

ही बोट हेवाळे संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली आहे. माजी अर्थ-राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी "चांदा ते बांदा' योजनेतून विशेष निधी दोडामार्ग वनक्षेत्रपाल यांना मंजूर केला होता. यामधून 12 प्रवासी वाहतुकीची इंजिन असणारी बोट निर्माण केली आहे.

inauguration of tilari jungle safari boat in sindhudurg
पावसाळ्यानंतर तिलारीत बोटीतून जंगल सफारी
author img

By

Published : Jun 28, 2020, 3:52 PM IST

सिंधुदुर्ग - तिलारी आंतरराज्य प्रकल्प पर्यटन आणि जंगल सफारीसाठी चांदा ते बांदा योजनेतून "तिलारी जंगल सफारी' बोट उपलब्ध झाली आहे. कोरोनाच्या संकटातून सुटका झाल्यावर पावसाळ्यानंतर ही बोट पर्यटनाला पुरक ठरणार आहे.

ही बोट हेवाळे संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली आहे. माजी अर्थ-राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी "चांदा ते बांदा' योजनेतून विशेष निधी दोडामार्ग वनक्षेत्रपाल यांना मंजूर केला होता. यामधून 12 प्रवासी वाहतुकीची इंजिन असणारी बोट निर्माण केली आहे. त्यामध्ये दहा पर्यटक बसतील. बोटीमध्ये जॅकेट व अन्य सुविधा देखील असतील, असे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी सांगितले.

तिलारी जंगल सफारी असे या बोटीचे नामकरण करण्यात आले आहे. वनखात्यासाठी जंगलाच्या संरक्षणालादेखील या बोटीचा फायदा होईल, असे चव्हाण आणि सहाय्यक वनसंरक्षक इस्माईल जळगावकर यांनी सांगितले. पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत ही बोट हेवाळे संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.