सिंधुदुर्ग - जिल्ह्यात शासनाच्या नव्या निकषानुसार खासगी बस किंवा रेल्वेमधून येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाइन रहावे लागणार आहे. मात्र, हे संस्थात्मक क्वारंटाइन नसून होम क्वारंटाइन असेल. तसे आदेश आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यात प्रवेश करताच होम क्वारंटाइनव्हावे लागणार आहे.
थांब्यावर उतरल्यावर प्रवाशांच्या हातावर 14 दिवस होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जाईल, असे आदेश राज्याच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. त्यानुसार सार्वजनिक प्रवासी वाहतूक - राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासनाच्या बसेसला 50 टक्के आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असेल. मात्र, उभे राहून प्रवास करण्यास मनाई असेल. रेल्वे अधिकारी किंवा एसटी बस अधिकारी स्थानिक प्रवाशांना प्रवाशांची सर्व माहिती स्क्रिनिंग करिता पुरवतील किंवा उपलब्ध करून देतील. थांब्यावर उतरल्यावर प्रवाशांच्या हातावर 14 दिवस गृह विलगीकरण अर्थात होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जाईल.
रेल्वे आणि सरकारी बस आस्थापना मारणार क्वारंटाइन असा शिक्का -
थर्मल स्कॅनरमध्ये लक्षणे दिसल्यास संबंधित प्रवाशास कोविड केंद्र किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवले जाईल. सार्वजनिक वाहनाद्वारे येणाऱ्या प्रवाशांची रॅपीड अँटिजेन चाचणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या थांब्यावर अधिकृत लॅबद्वारा सेवा पुरवतील. चाचणीचा खर्च संबंधित प्रवाशाकडून किंवा बस सेवा पुरवणाऱ्याकडून घेतला जाईल. आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या हातावर रेल्वे प्रशासन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याद्वारे क्वारंटाइन असा शिक्का मारण्यात यावा, या अटी व शतींमध्ये अधिन राहून जिल्हांतर्गत किंवा आंतरजिल्हा सेवा देणाऱ्या लांब पल्ल्यांच्या बस किंवा रेल्वे सुरू राहतील.
खासगी सेवा बसेसच्या क्षमतेच्या 50 टक्के चालू ठेवण्यास परवानगी -
खासगी प्रवासी वाहतूक-खासगी बस सेवा वगळता प्रवासी वाहतूक केवळ आपत्कालीन किंवा अत्यावश्यक सेवेच्या किंवा वैध कारणांसाठी ड्रायव्हरसह बसेसच्या क्षमतेच्या 50 टक्के चालू ठेवण्यास परवानगी असेल. हे आंतरजिल्हा किंवा आंतर शहर असण्याची अपेक्षा नाही आणि ते प्रवशांच्या निवासस्थानापुरतेच मर्यादित असावेत.