ETV Bharat / state

प्रत्येक कुटुंबाला मास्क अन् सॅनिटायझर वाटपाचे नियोजन तातडीने करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सव्वा दोन लाख घरांमध्ये सॅनिटायझरचे वाटप आणि सुमारे 8 लाख लोकांना प्रत्येकी दोन मास्कचे वाटप करण्यासाठी तातडीने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.

पालकमंत्री उदय सामंत
पालकमंत्री उदय सामंत
author img

By

Published : Nov 29, 2020, 3:03 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील सव्वा दोन लाख घरांमध्ये सॅनिटायझरचे वाटप आणि सुमारे 8 लाख लोकांना प्रत्येकी दोन मास्कचे वाटप करण्यासाठी तातडीने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (दि. 28 नोव्हेंबर) दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम व जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थितीची पालकमंत्री पालकमंत्री सामंत यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची तज्ज्ञांनी शक्यता वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबास सॅनिटायझरचे वाटप करायच्या सूचना दिल्या आहेत.

मृत्यू दर कमी करणे गरजेचे

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकास दोन मास्कचे वाटप करावयाचे आहे. यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करून जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने कार्यवाही सुरू करावी. प्रत्येकाने मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे ही गरज आहे. तसेच लोकांच्या आरोग्याचा विचार करून ही कारवाई लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनी काम करावे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यात आली आहे. कोरोनावर संपूर्ण नियंत्रण मिळवणे, मृत्यू दर आणखी घटवणे व बाधितांचे दर कमी करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

यांची होती बैठकीत उपस्थिती

या बैठकीस खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा - ...तर भाजप करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी डेपो बंद आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.