ETV Bharat / state

सिंधुदुर्गात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू - सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक

ग्रामंपचायत निवडणुका जाहीर झाल्यानंर ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, तेथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामध्ये पॅनल उभा करण्यासाठी आणि उमेदवार निवडीसाठी पुढारी मंडळीचा ग्रामपंचायती कडे राबता वाढलेला आहे. १५ जानेवारीला ग्रामंपचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

जिल्हाधीकारी के मंजुलक्ष्मी
जिल्हाधीकारी के मंजुलक्ष्मी
author img

By

Published : Dec 20, 2020, 12:27 PM IST

सिंधुदुर्ग - मुदत संपूनही कोरोनामुळे रखडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021ला मतदान, तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. दरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन जिल्हाधीकारी के मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

जिल्ह्यात 70 ग्रामपंचायतीच्या निवडणुका -

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील 431 पैकी 70 ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत ऑगस्ट 2020 मध्ये संपली होती. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुका घेणे आवश्यक होते. परंतु त्याचवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू होता. त्यामुळे राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याने ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलून प्रशासक नियुक्त केले होते. कोरोनाचा प्रभाव कमी होताच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

23 पासून दाखल होणार नामनिर्देशन पत्र

डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. छाननी 31 डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारीपर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी रोजी होईल. 25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

निवडणुका होणाऱ्या जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायती

निवडणुका होणाऱ्या सत्तर ग्रामपंचायती : सावंतवाडी तालुका – मळगाव, इन्सुली, चौकुळ, मळेवाड, आंबोली, तळवडे, दांडेली, आरोस, आरोंदा, डिंगणे, कोलगाव. वैभववाडी तालुका – सांगुळवाडी, नाधवडे, सोनाळी, कुंभवडे, ऐनारी, लोरे नं. 2, कोकिसरे, वेंगसर, मांगवली, भुईबावडा, खांबाळे, आचिर्णे, एडगाव. मालवण तालुका – कुणकवळे, मसदे-चुनवरे, गोळवण-कुमामे, खरारे-पेंडूर, आडवली-मांडली, चिंदर. वेंगुर्ले तालुका – सागरतीर्थ, आरवली. कणकवली तालुका – भिरवंडे, तोंडवली-बावशी, गांधीनगर. दोडामार्ग तालुका – तेरवण-मेढे, आयनोडे-हेवाळे, कुडासे. कुडाळ तालुका – गोवेरी, वाडोस, गोठोस, आकेरी, गिरगाव-कुसगाव, कुपवडे, वसोली, पोखरण-कुसबे, माडय़ाचीवाडी. देवगड तालुका – धालवली, गडीताह्माणे, इळये, कातवण, कोरले, कुणकेश्वर, लिंगडाळ, मिठबाव, मेंड, मोंडपार, मुणगे, मुटाट, नाडण, पाळेकरवाडी, पाटथर, पुरळ, रहाटेश्वर, शिरगाव, तळवडे, तांबळडेग, टेंबवली, वाडा, वरेरी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.