ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावरील गडनदी पुलाचा जोडरस्ता खचला; एकेरी वाहतूक सुरू

author img

By

Published : Jun 21, 2019, 10:37 AM IST

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे नव्या रस्त्यासाठी अनेक ठिकाणी मातीचा भराव टाकण्यात आला आहे. अश्याच पद्धतीने कणकवली गडनदी पुलाचा जोडरस्ता बनवला गेला. मात्र, मान्सून पूर्व पावसातच हा नवीन जोडरस्ता खचला.

मुंबई-गोवा महामार्गावरील गडनदी पुलाचा खचलेला जोडरस्ता

सिंधुदुर्ग - मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली गडनदी पुलाचा जोडरस्ता गुरुवारी सायंकाळी खचला. यामुळे सध्या येथून एकेरी वाहतूक सुरू आहे. मान्सूनपूर्व पावसातच या नव्या रस्त्याला १० ते १२ फुटांचे भगदाड पडल्याने रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील गडनदी पुलाचा खचलेला जोडरस्ता

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे नव्या रस्त्यासाठी अनेक ठिकाणी मातीचा भराव टाकण्यात आला आहे. अश्याच पद्धतीने कणकवली गडनदी पुलाचा जोडरस्ता बनवला गेला. मात्र, मान्सून पूर्व पावसातच हा नवीन जोडरस्ता खचला. रस्त्याला अक्षरशः १० ते १२ फुटांचे भगदाड पडले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र, चौपदरीकरण कामाच्या गुणवत्तेवर या घटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

काही काळासाठी वाहतूक बंद -

कलमठ ते झाराप या टप्प्यासाठी दिलीप बिल्डकॉन कंपनीकडे या महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका आहे. मात्र, या ठेकेदाराच्या निकृष्ट कामावर सतत नागरिकांकडून सवाल उपस्थित केले जात आहे. तरी देखील प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. दरम्यान या घटनेने नागरिकांच्या आरोपाला दुजोरा मिळाला. त्यामुळे रस्ता खचण्याच्या घटनेनंतर नागरिकांनी काही वेळासाठी धोकादायक मार्गावरील वाहतूक बंद पाडली होती.

काही काळानंतर या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे रस्ता खचल्यानंतर तो पूर्वपदावर आणण्यासाठी ठेकेदाराकडून वेगाने हालचाली सुरू झाल्या. मात्र, महामार्गाच्या निकृष्ट कामाची पावसाने पोलखोल केल्याची चर्चा रंगली आहे.

Intro:सिंधुदुर्ग: मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली गडनदी पुलाचा जोडरस्ता गुरुवारी सायंकाळी खचला. यामुळे सध्या येथून एकेरी वाहतूक सुरू आहे. मान्सूनपूर्व पावसातच या नव्या रस्त्याला १० ते १२ फुटांचे भगदाड पडल्याने कामाच्या दर्जाबाबत संताप व्यक्त होत आहे. Body:मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे नव्या रस्त्यासाठी अनेक ठिकाणी मातीचा भराव टाकण्यात आला आहे. अश्याच पद्धतीने कणकवली गडनदी पुलाचा जोडरस्ता बनवला गेलाय. मात्र मान्सून पूर्व पावसातच हा नवीन जोडरस्ता खचला. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. रस्त्याला अक्षरशः १० ते १२ फुटांचे भगदाड पडले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र चौपदरीकरण कामाच्या गुणवत्तेवर या घटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Conclusion:काही काळासाठी वाहतूक बंद !

कलमठ ते झाराप या टप्प्यासाठी दिलीप बिल्डकॉन कंपनीकडे महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका आहे. मात्र या ठेकेदाराच्या निकृष्ट कामावर सतत नागरिकांकडून सवाल उपस्थित केले गेले आहेत. तरी देखील प्रशासन याकडे डोळे झाक करीत आहे. दरम्यान आजच्या घटनेने नागरिकांच्या आरोपाला दुजोरा मिळाला. त्यामुळे रस्ता खचण्याच्या घटनेनंतर नागरिकांनी काही वेळासाठी धोकादायक मार्गावरील वाहतूक बंद पाडली होती.

काही काळानंतर या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे रस्ता खचल्यानंतर तो पूर्वपदावर आणण्यासाठी ठेकेदाराकडून वेगाने हालचाली सुरू झाल्या. मात्र या घटनेने महामार्गाच्या निकृष्ट कामाची पावसाने पोलखोल केल्याची चर्चा रंगली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.