ETV Bharat / state

कुडाळ येथे घरावर एफडीएचा छापा; अवैध गुटखा जप्त - fda

कुडाळ पोलिसांच्या सहकार्याने सिंधुदुर्गच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

जप्त करण्यात आलेला अवैध गुटखा
author img

By

Published : Mar 17, 2019, 8:23 AM IST

सिंधुदुर्ग - कुडाळ येथील लक्ष्मीवाडी येथे सिंधुदुर्गच्या एफडीए विभागाने घरावर धाड टाकून अवैध गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ९२ हजार ८५० रूपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. कुडाळ लक्ष्मीवाडी येथील प्रकाश पाडुरंग कांबळी यांच्या घरावर हा छापा टाकण्यात आला आहे.

कुडाळ पोलिसांच्या सहकार्याने सिंधुदुर्गच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई केली गेली. यामध्ये कांबळी यांच्या घरामध्ये स्वतंत्ररित्या केलेल्या एका खोलीत हा गुटखा साठवून ठेवण्यात आला होता. यामध्ये पान मसाला, दुबई गुटखा, विमल तैंमुर यासारख्या ब्रँडचा समावेश होता. हा गुटखा पंचनामा करून जप्त करण्यात आला. ओरोस येथील अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत कुडाळ पोलीस, ओरोस पोलीस तसेच आरोग्य प्रशासनाचे सहकार्य घेण्यात आले.
या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी प्रियांका वाईकर, अन्न भेसळ विभागाचे सहाय्यक आयुक्त शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी पौणिमा बिद्रे, पोलीस शिपाई जाधव, व्ही. एल पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवि जाधव, शिपाई मुंडे आदी सहभागी झाले होते. या घटनेची फिर्याद प्रियांका वाईकर यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे. राज्यात गुटखा विक्री आणि साठवणुकीस कायद्याने बंदी आहे. तरी देखील काळ्या बाजाराने गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. आजच्या कारवाईने जिल्ह्यात गुटख्याचा काळा बाजार छुप्या पद्धतीने सुरू आहे. हेच उघड झाले आहे.

Intro:कुडाळ लक्ष्मीवाडी येथे घरावर धाड टाकून अवैद्य गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग एफडीए विभागाने ही धडक कारवाई केली. यात सुमारे ९२ हजार ८५० रू. किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.Body:कुडाळ लक्ष्मीवाडी येथील प्रकाश पाडुरंग कांबळी यांच्या घरावर छापा टाकून सुमारे ९२ हजार ८५० रू. किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत कुडाळ पोलिसांनी एफडीएला सहकार्य केले. अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहीती नुसार ही कारवाई केली गेली. या नुसार प्रकाश पाडुरंग कांबळी यांच्या घरावर छापा टाकला. यात त्यांच्या घरामध्ये स्वतंत्र्य रित्या केलेल्या एका खोलीत हा गुटखा साठवून ठेवण्यात आला होता. यामध्ये पान मसाला, दुबई गुटखा, विमल तैंमुर यासारख्या ब्रॅंडचा समावेश होता. हा गुटखा पंचनामा करून जप्त करण्यात आला. ओरोस येथील अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत कुडाळ पोलिस, ओरोस पोलिस तसेच आरोग्य प्रशासनेचे ही सहकार्य घेण्यात आले. यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी प्रियांका वाईकर, अन्न भेसळ विभागाचे सहाय्यक आयुक्त तु. ना. शिंगाडे, कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शितल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी पौणिमा बिद्रे, कुडाळ पोलिस हे. कॉ. जाधव, व्ही. एल पवार, ओरोस पोलिस ए. एस. आय रवि जाधव, पो. शिपाई मुंडे आदी सहभागी झाले होते. यातील संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून उशिरा पर्यत याबाबत पोलिस स्थानकात कारवाई सूरू होती. या घटनेची फिर्याद प्रियांका वाईकर यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे.Conclusion:राज्यात गुटखा विक्री आणि साठवणुकीस कायद्याने बंदी आहे. तरी देखील काळ्या बाजाराने गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. आजच्या कारवाईने जिल्ह्यात गुटख्याचा काळा बाजार छुप्या पद्धतीने सुरू आहे. हेच उघड झाले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.