ETV Bharat / state

सिंधुदुर्गात कावळा मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ

जिल्ह्यातील बांदा शहरात आज स्मशानभूमीनजीक कावळा मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

कावळा मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ
कावळा मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ
author img

By

Published : Jan 23, 2021, 9:53 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील बांदा शहरात आज स्मशानभूमीनजीक कावळा मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. देशात कोरोना साथीच्या पाठोपाठ बर्ड फ्ल्यूची साथ आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बांदा शहरात आढळला कावळा-

बांदा शहरात आज सकाळी खेमराज प्रशालेच्या नजीक असलेल्या स्मशानभूमी रस्त्यावर कावळा मृतावस्थेत आढळला आहे. मात्र याबाबत वनविभाग व स्थानिक प्रशासनाला कोणतीही कल्पना नव्हती. दोन दिवसांपूर्वी तेरेखोल नदीपात्रानजीक देखील दोन कावळे मृतावस्थेत आढळल्याचे स्थानिकांनी पाहिले होते. बर्ड फ्ल्यू साथीच्या पार्श्वभूमीवर कावळे मृतावस्थेत आढळण्याच्या घटना वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतावस्थेत आढळलेल्या कावळ्याचे विच्छेदन करण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात खळबळ-

सध्या राज्यात कोरोना नंतर बर्ड फ्ल्यूची साथ आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर चिकन व्यवसाय धोक्यात आला आहे. जिल्ह्यात अद्याप या रोगाची पुष्टी झाली नसल्याने चिकन व्यवसाय ठेवढासा प्रभावित झालेला नाही. मृत कावळा सापडल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बर्ड फ्ल्यूच्या धोक्याने सिंधुदुर्गात पोल्ट्री व्यावसायिक धास्तावले-

राज्यभरात बर्ड फ्लूने थैमान घातले असून पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. सिंधुदुर्गात बर्ड फ्लूचा अद्याप धोका नसला तरी मागणी घटल्यामुळे येथील पोल्ट्री व्यवसायीक धास्तावले आहेत. त्यांना कर्जाचे हप्ते कसे भरावे, याची चिंता सतावत आहे.

सिंधुदुर्गात दीड हजार व्यावसायिक -

जिल्ह्यात दिवसाला दोन लाख अंड्यांची मागणी होती. ती आता 80 हजारापर्यंत खाली आली आहे. तर चिकनची मागणी 40 ते 45 हजार किलोची होती. ती आता 15 ते 20 हजार किलोपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे पोल्ट्री आणि अंडी व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड हजार ते दोन हजार छोटे- मोठे पोल्ट्री व्यावसायिक आहेत. तर एकट्या कुडाळमधील माणगाव खोऱ्यात चारशे ते पाचशे व्यवसायिक पोल्ट्री आणि अंड्यांचा व्यवसाय करतात. मात्र, बर्ड फ्लूच्या धोक्यामुळे आता मागणी घटल्यामुळे हे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. राज्य सरकारने मेलेल्या कोंबड्याना 90 आणि 70 रूपये नुकसान भरपाईची घोषणा केली असली, तरी सिंधुदुर्गात रोगामुळे कोंबडी मरण्याचे प्रमाण शुन्य आहे.

हेही वाचा- राज्यात आज २४ हजार २८२ जणांचे कोरोना लसीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.