ETV Bharat / state

सिंधुदुर्ग : विनयभंगाचा आरोप असलेले डॉ. श्रीमंत चव्हाण यांची पोलीसां समोर शरणागती

सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातील शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांची ओपीडीसमोर केबिन आहे. डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्या केबिनच्या बाहेरील बाजूला महिला सुरक्षा तैनात असतात. ही कंत्राटी महिलाही तिकडेच कर्तव्याला असायची. श्रीमंत चव्हाण वारंवार त्या महिलेला कॅबिनमध्ये बोलावून स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते. अशी तक्रार त्या महिलेने दिली होती.

चव्हाण
चव्हाण
author img

By

Published : Apr 8, 2021, 5:50 PM IST

सिंधुदुर्ग - विनयभंगाच्या गुन्ह्याखाली फरार असलेले सिव्हिल सर्जन डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी अखेर आज (गुरुवार) सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात शरणागती पत्कारत हजर झाले. फेब्रुवारी महिन्यापासून ते पोलीसांना हुलकावणी देत होते. अखेर त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले
डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी विनयभंग केल्याची फिर्याद सिव्हिल हॉस्पिटलमधील पीडित महिला कर्मचाऱ्याने दिली होती. त्यानुसार डॉ.श्रीमंत चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक टाळण्यासाठी डॉ.चव्हाण यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर डॉ. चव्हाण यांनी अटक टाळण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टानेही 23 मार्च रोजी डॉ.चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टात जाणे अथवा पोलिसांना शरण जाणे, हे दोन पर्याय डॉ.चव्हाण यांच्यासमोर होते. 23 मार्चपासून डॉ.चव्हाण पोलिसांना हुलकावणी देत होते. अखेर आज (गुरुवार) डॉ.श्रीमंत चव्हाण सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. डॉ.चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.

हा होता आरोप
सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातील शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांची ओपीडीसमोर केबिन आहे. डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्या केबिनच्या बाहेरील बाजूला महिला सुरक्षा तैनात असतात. ही कंत्राटी महिलाही तिकडेच कर्तव्याला असायची. श्रीमंत चव्हाण वारंवार त्या महिलेला कॅबिनमध्ये बोलावून स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते. अशी तक्रार त्या महिलेने दिली होती.

पीडितेला दिली होती धमकी
माझी तक्रार केल्यास तुला नोकरीवरून काढून टाकेन, अशी धमकी त्या डॉक्टरांनी महिलेला दिल्याचे महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे अश्लील चाळे आणि छळाला कंटाळून अखेर त्या महिलेनं पोलीस स्टेशन गाठत श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात तक्रार दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर त्यांना अटक झाली आहे.

हेही वाचा -दोन दिवसात लॉकडाऊन हटवा, अन्यथा... खा. नवनीत राणांचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.