ETV Bharat / state

सिंधुदुर्गात कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन घोषित - सिंधुदुर्ग संचारबंदी

हॉटेल, रेस्टॉरंट यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 11 ते दुपारी 2 व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रास्त भाव दुकाने सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील. जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवणेस परवानगी असेल. लसीकरणाकरिता प्रवास करणाऱ्या व्यक्तींना व माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत काम करणाऱ्यांना यामधऊन सूट देण्यात येत आहे. 

जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी
author img

By

Published : May 8, 2021, 10:14 PM IST

सिंधुदुर्ग - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी 9 मेला रात्री 12 ते 15 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. लॉकडाऊनच्या या काळात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

काय आहे आदेशात?

सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी) यासह पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्यांच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तसेच सदर दुकानांची घरपोच सेवा (Home Delivery) सकाळी 7 ते सकाळी 11 या कालावधीतच चालू ठेवणेस परवानगी राहील.

आंबा वाहतुकीस परवानगी

वाहतुकी दरम्यान कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. कृषि अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकानांची सेवा सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील. हॉटेल, रेस्टॉरंट यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 11 ते दुपारी 2 व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रास्त भाव दुकाने सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील. जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवणेस परवानगी असेल. लसीकरणाकरिता प्रवास करणाऱ्या व्यक्तींना व माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत काम करणाऱ्यांना यामधऊन सूट देण्यात येत आहे.

...अन्यथा होणार कारवाई

रास्त भाव दुकान, आंबा वाहतूक व शिवभोजन केंद्र याठिकाणी कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860(45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेश मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.