ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेशासाठी 16 हजार 934 अर्ज, तर परराज्यात जाण्यासाठी 8 हजार 760 जणांची नोंदणी

author img

By

Published : May 8, 2020, 11:44 AM IST

उत्तरप्रदेशमधील 24, तेलंगाणामधील 11, राजस्थानमधील 12 जणांना 5 मे रोजी रवाना करण्यात आले. तर गुरुवारी रायगड जिल्ह्यातील 13 व मालवण व वैभववाडी तालुक्यातून राजस्थानमधील एकूण 11 जणांना रवाना करण्यात आले आहे.

details of entry and outing of migrant workers from sindhudurg
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेशासाठी 16 हजार 934 अर्ज, तर परराज्यात जाण्यासाठी 8 हजार 760 जणांची नोंदणी

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातून जाण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या लिंकवर आजपर्यंत एकूण 16 हजार 934 नागरिकांनी नोंद केली आहे. त्यापैकी जिल्ह्यातून राज्यातील इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 8 हजार 174 व्यक्तींनी नोंद केली आहे. तर परराज्यात जाण्यासाठी 8 हजार 760 व्यक्तींचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने 110 पासेस दिले आहेत. तर 71 व्यक्तींना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

उत्तरप्रदेशमधील 24, तेलंगाणामधील 11, राजस्थानमधील 12 जणांना 5 मे रोजी रवाना करण्यात आले. तर गुरुवारी रायगड जिल्ह्यातील 13 व मालवण व वैभववाडी तालुक्यातून राजस्थानमधील एकूण 11 जणांना रवाना करण्यात आले आहे. गोवा राज्यात अडकलेल्या जिल्ह्यावासियांना जिल्ह्यात परतण्यासाठी पास देण्यात आले असून सदर लोक जिल्ह्यात दाखल होत आहेत. आतापर्यंत गोवा राज्यातून सुमारे 317 व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. हे व्यक्ती एस.टी. बस तसेच खासगी वाहनाने आले आहेत. तर गोव्यातील 98 व्यक्ती एस. टी बसने व 30 व्यक्ती खासगी वाहनाने जिल्ह्यात येणार आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातूनही नागरिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजमितीस एकूण 555 व्यक्ती अलगीकरणात असून त्यापैकी 341 व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर 214 व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत एकूण 628 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 594 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी 3 नमुने पॉझिटीव्ह आले असून 591 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

नव्याने रुग्ण आढळलेल्या वायंगणी गावालगतचा तीन किलोमीटरचा परिसर कंन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. कन्टेन्मेंट झोन क्षेत्रात एकूण तीन गावे व वाड्यांचा समावेश होत असून या ठिकाणी 23 सेक्टर पाडून त्यानुसार तपासणी करण्यात येत आहे. एकूण 4 हजार 782 नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. सेक्टर निहाय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.