सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील वेंगुर्ले कालवी बंदर येथे मोठा डॉल्फीन मासा मृतवस्थेत आढळला आहे. या माशाची लांबी साधारण १० फुट इतकी आहे. सध्या जिल्ह्यात तापमानाने 38 अंशाची सरासरी गाठली असल्याने हा मृत डॉल्फीन कुजण्यास सुरुवात झाली असून त्याची दुर्गंधी परिसरात पसरु लागली आहे.
जिल्ह्याच्या वनविभागाला यासंदर्भात स्थानिकांनी माहिती दिली आहे. मात्र, अजुन कोणीही याची दखल घेतलेली नाही. कालवी बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. या माशाची योग्यवेळी विल्हेवाट लावली गेली नाही, तर येथील नागरिकांना माशाच्या दुर्गंधीला तोंड द्यावे लागणार आहे.