सिंधुदुर्ग - तळकोकणात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. परिणामी या ठिकाणी शेकडो हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान झाले आहे. अशातच वाचलेल्या भातशेतीचेही वन्य प्राणी नुकसान करत आहेत. या नुकसानामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव रेडकरवाडीत भर वस्तीत गव्यांचा कळप घुसला आहे. या कळपाने परिसरात अक्षरशः धुडगूस घातला आहे. या गव्यांनी येथील भात शेतीला लक्ष करत पीक फस्त केले आहे. तसेच भातशेतीची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.