सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील सावंतवाडीमधील पाडलोस, दांडेली परिसरात गव्यांचा कळप सध्या धुमाकुळ घालत आहे. हे गवे सध्या काजू बागायतीमध्ये नासधूस करीत आहेत. काजू, कलमासोबत भुईमूग, माड आणि पोफळीचे मोठ्या प्रमाणावर गवे नुकसान करत आहेत.
हेही वाचा... 'दीड महिन्यांपासून घेतली नव्हती हो..' पण आता पोलीस म्हणतायेत घरी जा, पुण्यात मद्यपींची निराशा
दांडेली येथे चार ते पाच गव्यांचा कळप सध्या काजू बागायतीमध्ये नुकसान करत आहेत. सध्या काजूचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना बागायतीत जाण्याशिवाय पर्याय नाही. वनविभागाने शेतकऱ्यांचा काजू वाचवण्यासाठी अशा उपद्रवी गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. वनविभाग कोणतीही उपाययोजना करत नसल्याने ग्रामस्थांच्या जीवाला पर्यायाने उत्पन्नासही धोका निर्माण झाला आहे. एकीकडे काजू बियांच्या दरात होणारी घसरण तर दुसरीकडे गव्यांकडून काजूचे होणारे नुकसान अशा द्विधा संकटात शेतकरी सापडला आहे.