सिंधुदुर्ग - जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्टीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली आहे. दरवर्षी जिल्ह्यातील किनारी भागात 3 लाख पर्यटक येतात. परंतु यावर्षी येथील पर्यटन व्यवसायावर कोरोनाचे सावट दिसून येत आहे. यावर्षी 10 टक्केच पर्यटक आल्याचे स्थानिक व्यावसायिक सांगत आहे. कोरोनाची भीती जशी पर्यटकांमध्ये आहे तशीच ती स्थानिकांमध्येही दिसून येत आहे.
यावर्षी पर्यटकांची संख्या घटली -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किल्ला हे पर्यटकांचे माहेरघर. दरवर्षी या किल्ल्याला दिवाळीच्या सुट्टीत साधारण 1 लाख पर्यटक भेट देत असतात. यावर्षी ही संख्या10 टक्के एवढी देखील नाही. मात्र, या किल्ल्यावर सध्या पुरेशी काळजी घेऊनच पर्यटकांना सोडले जात आहे. मालवण किल्ल्यावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रवाशी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून बोट सेवा चालवली जाते. या बोट सेवेच्या बुकिंग केंद्रात काम करणाऱ्या कामगारांनुसार मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पर्यटकांची संख्या घटली आहे. शिवाय नियम आणि अटी लादून शासनाने ही सेवा सुरू करायला परवानगी दिली आहे. पूर्वी आम्ही एका बोटीतून 25 पर्यटक नेत होतो. आता 11 ते 12 पर्यटक न्यावे लागतात. बोट वाहतूक करणाऱ्यांना ते परवडत नाही. बोट व्यवासायिक सांगतात.
3 हजार रूम आहेत. मात्र, त्यापैकी 10 टक्केच बुक झाले-
याठिकाणी पर्यटकांची काळजी घेतली जाते. मात्र, पर्यटकच कमी आहेत. आम्हाला मागच्यावेळी किल्ल्यावर नेताना मोठ्या संख्येने हे लोक घेऊन गेले होते. मात्र, आता फॅमिली घेऊन जातात. पर्यटकांची या ठिकाणी काळजी घेतली जात असल्याचे पर्यटक मुझेफा बोरा यांनी सांगितले. तसेच आमचा मे महिन्याचा हंगाम गेला आणि आता पर्यटक येतील असे वाटत होते. मात्र, 10 टक्केच पर्यटक आले आहेत. त्यामुळे आमच्याकडे बुकिंग आहे. परंतु ते पुढच्या दिवसांसाठी आहे. दिवाळी हंगाम मात्र आमचा फुकट गेला आहे. मालवणमध्ये साधारण 10 हजार पर्यटक राहू शकतील, असे 3 हजार रूम आहेत. मात्र, त्यापैकी 10 टक्केच बुक झाले असल्याचे व्यापारी पथसंस्थेचे चेअरमन आणि व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष नितीन वाळके यांनी सांगितले. दरम्यान कोरोनाचा काळ हा सिंधुदुर्गात पर्यटन व्यवसायासाठी अत्यंत कठीण गेला आहे. दिवाळीत व्यावसायिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, ती देखील फोल ठरली आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिक चिंतेत आहेत.