ETV Bharat / state

सिंधुदुर्गात खळबळ, डेल्‍टा प्लस रूग्‍ण सापडलेल्‍या ६ इमारती १४ दिवसांसाठी सील

author img

By

Published : Jun 24, 2021, 10:05 PM IST

कणकवली शहरातील परबवाडी भागात कोविड डेल्‍टा प्लसचा रूग्‍ण सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रुग्ण सापडलेल्या मारतीसह एकूण 6 इमारती प्रशासनाने १४ दिवसांसाठी सील केल्या आहेत. येथे पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. तर, 'कोविड डेल्‍टा प्लसचा रूग्‍ण बरा झाला आहे. कोणीही घाबरू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये', असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी म्हटले आहे.

Sindhudurg
Sindhudurg

सिंधुदुर्ग - कणकवली शहरातील परबवाडीतील ज्या भागात कोविड डेल्‍टा प्लसचा रूग्‍ण सापडला आहे. त्‍या भागातील 6 इमारती सील करण्यात आल्‍या आहेत. या इमारतींमधील प्रत्‍येक नागरिकाचा स्वॅब घेण्यात आला आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या भागात उपाययोजना राबवल्या जात आहेत. याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

सिंधुदुर्गात सापडला कोरोना डेल्टा प्लसचा रुग्ण

रुग्ण सापडलेल्या परिसरात पोलीसही तैनात

'सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली शहरामध्ये कोविड डेल्‍टा प्लसचा रूग्‍ण सापडला आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण सापडलेल्या भागात आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपाययोजना राबवल्या जात आहेत. कणकवली शहरात रुग्ण सापडलेल्या इमारतीसह एकूण 6 इमारती प्रशासनाने १४ दिवसांसाठी सील केल्या आहेत. याठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणच्या प्रत्‍येकाची ऑक्‍सिजन पातळी आणि तापमानही तपासले जात आहे', असे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितले.

सर्व खबरदारी-उपाययोजना सुरू

कोविड डेल्‍टा प्लस रूग्‍णांकडून कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्‍याने आरोग्‍य यंत्रणा तसेच कणकवलीचा नगरपंचायत विभाग सतर्क झाला आहे. कोविड डेल्‍टा रूग्‍ण सापडलेल्‍या परबवाडीतील कामतसृष्‍टी भागाला गुरुवारी (24 जून) उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी भेट दिली. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी नगराध्यक्ष नलावडे यांनी नगरपंचायत माध्यमातून सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या असल्याची माहिती दिली.

रुग्ण बरा झालाय, नागरिकांनी घाबरू नये - नगराध्यक्ष

'कणकवली शहरात रेल्वे स्थानकाजवळ डेल्टा प्लसचा रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण उपचाराअंती बरा झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. डेल्टा प्लसचा रुग्ण महिन्याभरापूर्वी पॉझिटिव्ह आढळला होता. मात्र, तो रुग्ण ज्या कॉम्प्लेक्समध्ये राहत आहे, त्या कॉम्प्लेक्समध्ये कोविडच्या संसर्गाचा प्रसार झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कणकवली नगरपंचायत व आरोग्य विभाग यांच्याकडून सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत ', असेही नगराध्यक्षांनी सांगितले.

हेही वाचा - अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीचा प्रस्ताव कार्यकारणीत पारित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.