ETV Bharat / state

सिंधुदुर्गात कोरोनाचा समूह संसर्ग; पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती - Sindhudurg corona patients

गेल्या तीन दिवसात हजार रुग्ण सापडले. मात्र, याचवेळी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे केवळ 30 खाटा शिल्लक आहेत. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यातील एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालय, तायशेटे रुग्णालय, महिला रुग्णालय व गृहरक्षक दल कार्यालय या ठिकाणी नव्याने 202 खाटांची व्यवस्था करण्यात आली. मालवण येथील झाट्ये रुग्णालयात कोविड केंद्राला परवानगी देण्यात आली, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग
author img

By

Published : Apr 14, 2021, 10:23 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाला असून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळू लागले आहेत. गेल्या तीन दिवसात हजार रुग्ण सापडले. मात्र, याचवेळी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे केवळ 30 खाटा शिल्लक आहेत. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यातील एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालय, तायशेटे रुग्णालय, महिला रुग्णालय व गृहरक्षक दल कार्यालय या ठिकाणी नव्याने 202 खाटांची व्यवस्था करण्यात आली. मालवण येथील झाट्ये रुग्णालयात कोविड केंद्राला परवानगी देण्यात आली, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

पालकमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

सामंत यांनी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांची 15 दिवसांच्या निर्बंधांबाबत बैठक घेतली. जिल्ह्यातील कृती दल व खासगी डॉक्‍टरांचीही बैठक घेतली. यानंतर त्यांनी झूमच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यातील सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते. या वेळी खासदार राऊत यांनीही आपली भूमिका विशद केल्याचे सामंत यांनी सांगितले.

नामवंत डॉक्‍टरांनी सहकार्य करण्याचे दिले आश्‍वासन

ते म्हणाले, पडवे येथील एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयात 50, तर तायशेटे हॉस्पिटलमध्ये 12 खाट घेतले आहेत. कुडाळ येथील महिला रुग्णालयामध्ये 70, तर गृहरक्षक दल कार्यालयात 65 खाटांची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यातील नामवंत डॉक्‍टरांनी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. आमदार नाईक यांनीही आपले परिचारिका महाविद्यालय कोविड केंद्रासाठी दिले. आपण भाजप जिल्हाध्यक्ष तेली यांना अन्य कोणत्या सुविधा आपल्या पक्षाच्या माध्यमातून उपलब्ध होतील, याची विचारणा करीत अधिकाधिक सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्हा वार्षिकचा 30 टक्के निधी कोरोनासाठी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा वार्षिकचा 30 टक्के निधी कोरोनासाठी वापरण्यास सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या 170 पैकी 51 कोटी रुपये वापरता येणार आहेत. यातून अधिकाधिक आरोग्य सुविधा निर्माण केल्या जातील, असे सामंत यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील परिचारिका महाविद्यालयाचे विद्यार्थी, नवीन डॉक्‍टर व निवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात सेवा द्यावी, त्यांना मानधन दिले जाईल, असेही त्यांनी आवाहन केले.

जिल्ह्याला 10 हजार कोरोना लस उपलब्ध

उदय सामंत म्हणाले, जिल्ह्याला 10 हजार कोरोना लस उपलब्ध झाल्या आहेत. आरोग्य संचालक अर्चना पाटील यांना जिल्ह्याची लोकसंख्या व बाधित रुग्णसंख्या याचा विचार करून जास्तीत जास्त लस देण्यास सांगितले. खासगी डॉक्‍टरांनी सेवा देण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे वेळापत्रक तयार करून खासगी डॉक्‍टरांची सेवा घेतली जाईल. जुने कोविड केंद्रे दोन दिवसांत पुन्हा सुरू केली जातील. दुसऱ्या जिल्ह्यांतून येणाऱ्यांना कोरोना चाचणी करून दाखल करावे.

भाजप नेते खासदार नारायण राणेंना दूरध्वनी करणार

एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयात अजून खाटा मिळाव्यात, त्या रुग्णालयामधील डॉक्‍टरांनी रोटेशन पद्धतीने कोरोना रुग्णांना सेवा द्यावी, यासाठी मी या रुग्णालयाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांना दूरध्वनी करणार असल्याचे सामंत यानी सांगितले. सध्याचे दिवस राजकारण आणि टीका करण्याचेही नाहीत. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आहेत. महिनाभर सर्वांनी एकत्र येऊन काम करूया, राजकारण नंतर करूया, चुकत असल्यास सांगावे. तुमच्या सल्ल्याने कोरोना जात असल्यास मी ते करायला तयार आहे. बैठक घेण्यास तयार आहे, पण सध्या राजकारण नको, अशी भावनिक हाकही पालकमंत्री सामंत यांनी विरोधकांना दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.