ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50 गावांमध्ये उभारण्यात येणार कोरोना काळजी केंद्र

author img

By

Published : May 29, 2021, 9:57 PM IST

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र असलेली 38 गावे, तसेच 5 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली 12 गावे, असे मिळून एकूण 50 गावांमध्ये प्रत्येकी 20 खाटांचे कोरोना काळजी केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. या माध्यमातून 1 हजार बेडची क्षमता वाढवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

पालकमंत्र्यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र असलेली 38 गावे, तसेच 5 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली 12 गावे, असे मिळून एकूण 50 गावांमध्ये प्रत्येकी 20 खाटांचे कोरोना काळजी केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. या माध्यमातून 1 हजार बेडची क्षमता वाढवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच जिल्ह्यातील 'एचआरसीटी' चाचण्यांच्या दरावर देखील निर्बंध आणले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सामंत यांच्या हस्ते आज 9 रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यातील 50 गावांमध्ये कोरोना काळजी केंद्रे

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र असलेली 38 गावे, तसेच 5 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली 12 गावे, असे मिळून एकूण 50 गावांमध्ये प्रत्येकी 20 खाटांचे कोरोना काळजी केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. या माध्यमातून 1 हजार बेडची क्षमता वाढवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

'एचआरसीटी'च्या चाचणीसाठी दर निश्चित - सामंत

'एचआरसीटी'च्या 16 स्लाईस चाचणीसाठी 2 हजार रुपये, 16 ते 64 स्लाईससाठी 2 हजार 500 रुपये आणि 64 स्लाईसच्या पुढे 3 हजार रुपये दर जिल्ह्यासाठी असणार आहेत. यापेक्षा अधिक दर कोणी आकारत असतील, तर संबंधितांची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडे करावी. जादा दर आकारणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी उदय सामंत यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील 50 गावांमध्ये उभारण्यात येणार कोरोना काळजी केंद्र

'तौक्ते'साठी 44 कोटी 98 लाख 53 हजार 400 रुपयांची मदत - सामंत

निसर्ग चक्रीवादळातील बाधितांसाठी आलेल्या मदतीचे वाटप झाले आहे. 'तौक्ते' चक्रीवादळात देखील मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई म्हणून 44 कोटी 98 लाख 53 हजार 400 रुपये मंजूर झाल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

9 रुग्णवाहिकेचं लोकार्पण

दरम्यान राज्यशासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 6 नवीन रुग्णवाहिका आणि खनिकर्म विभागाच्या माध्यमातून आणखी ३ नवीन रुग्णवाहिका अशा एकूण 9 रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी देण्यात आल्या आहेत. आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेंचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, आतापर्यंत एकूण 21 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या रुग्णवाहिकेंमुळे आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळाली आहे.

हेही वाचा - सोशल मीडियाच्या आधारावर लोकांना तुरुंगात टाकण्याचा केंद्राचा डाव - नवाब मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.