ETV Bharat / state

तळकोकणात पावसाची संततधार सुरूच; दोडामार्गमध्ये सर्वाधिक पाऊस !

तळकोकणात सध्या पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 140 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले, वैभववाडी तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे.

तळकोकणात सध्या पावसाची संततधार सुरूच आहे
author img

By

Published : Jul 24, 2019, 4:51 PM IST

सिंधुदुर्ग - तळकोकणात सध्या पावसाची संततधार सुरूच आहे. दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले, वैभववाडी तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तर गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 140 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.

तळकोकणात सध्या पावसाची संततधार सुरूच आहे

दोडामार्ग मध्ये 140 मिमी पाऊस झाला. तर सावंतवाडीत 72, वेंगुर्ला 29.02, कुडाळ 41, मालवण 33, कणकवली 88, देवगड 85 आणि वैभववाडीत 70 मिमी एवढा पाऊस झाला आहे.

तिलारी धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे. सध्या या धरणातून 85.80 घ.मी. प्रती सेकंद इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प 80.97 टक्के भरला असून धरणामध्ये आज 362.2270 दशलक्ष घन मीटर इतका पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तिलारी प्रकल्पामध्ये 83.32 टक्के इतका पाणीसाठा होता.

यासोबतच, अरूणा प्रकल्प 47.21 टक्के भरला असून, देवघर धरणामध्ये 59.37 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर, जिल्ह्यातील 13 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत.

Intro:तळकोकणात सध्या पावसाची संततधार सुरूच आहे. दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले, वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तर गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 140 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. Body:दोडामार्ग मध्ये 140 मिमी पाऊस झाला. तर सावंतवाडीत 72, वेंगुर्ला 29.02, कुडाळ 41, मालवण 33, कणकवली 88, देवगड 85 आणि वैभववाडीत 70 मिमी एवढा पाऊस झाला आहे.Conclusion:तिलारी धरणाच्या विसर्गामध्ये वाढ

तिलारी आंतरराज्य प्रकल्पातून सुरू करण्यात आलेल्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे. सध्या या धरणातून 85.80 घ.मी. प्रती सेकंद इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प 80.97 टक्के भरला असून धरणामध्ये आज 362.2270 द.ल.घ.मी इतका पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तिलारी प्रकल्पामध्ये 83.32 टक्के इतका पाणीसाठा होता. तर अरूणा प्रकल्प 47.21 टक्के भरला असून, देवघर धरणामध्ये 59.37 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर जिल्ह्यातील 13 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.