ETV Bharat / state

सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे धरणे तुडुंब; नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ

author img

By

Published : Jul 9, 2019, 6:14 PM IST

सततच्या पावसामुळे सिंधुदुर्गमधील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून आंबोली, माडखोल, निळेली, पावशी, हरकुळ, ओझरम आणि लोरे असे ७ लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरले आहेत.

मुसळधार पावसामुळे तुडुंब भरलेले धरण

सिंधुदुर्ग - तळकोकणातील दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून आंबोली, माडखोल, निळेली, पावशी, हरकुळ, ओझरम आणि लोरे असे ७ लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरले आहेत. ओझरम प्रकल्पासून सध्या १२.०८ घ.मी. प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर सनमटेंब आणि पुळास लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये ९० टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. देवघर मध्यम प्रकल्प ४५.३६ टक्के भरला आहे. तर तिलारी आंतरराज्य प्रकल्प ४३.८६ टक्के भरला आहे. सध्या या प्रकल्पामध्ये १९६.२२५० द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे.

मुसळधार पावसामुळे तुडुंब भरलेले धरण

तिलारी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात 80.80 मि.मी. इतका पाऊस झाला असून यंदाच्या वर्षीचा हा आजपर्यंत सर्वाधिक पाऊस आहे. दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे २ टीएमसी क्षमतेचा छोटा धरण प्रकल्प १०० टक्के भरला आहे. या धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. या धरण प्रकल्पावर प्रति तास २०० केव्ही विज निर्मीती होते. हा लहान जलविद्युत प्रकल्प आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीमध्येही वाढ होत असून तिलारी नदीची पातळी तिलारीवाडी येथे ३८.९०० मीटर इतकी आहे. पावशी येथे कर्ली नदीची पातळी ३.८०० मीटर असून खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3३२.०० मीटर इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी २३.८२ एवढा पाऊस झाला आहे.

Intro:तळकोकणात दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील आंबोली, माडखोल, निळेली, पावशी, हरकुळ, ओझरम आणि लोरे असे 7 लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरले आहेत. ओझरम प्रकल्पासून सध्या 12.08 घ.मी. प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर सनमटेंब आणि पुळास लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 90 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. देवघर मध्यम प्रकल्प 45.36 टक्के भरला आहे. तर तिलारी आंतरराज्य प्रकल्प 43.86 टक्के भरला असून सध्या या प्रकल्पामध्ये 196.2250 द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. तिलारी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 80.80 मि.मी. इतका पाऊस झाला असून यंदाच्या वर्षी आजपर्यंत Body:दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे २ टीएमसी क्षमतेचा छोटा धरण प्रकल्प १०० टक्के भरला असुन या धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. या धरण प्रकल्पावर प्रती तास २०० केव्ही विज निर्मीती होते. हा लहान जलविद्युत प्रकल्प आहे.Conclusion:जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीमध्येही वाढ होत असून तिलारी नदीची पातळी तिलारीवाडी येथे 38.900 मीटर इतकी आहे. पावशी येथे कर्ली नदीची पातळी 3.800 मीटर असून खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.200 मीटर इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 23.82 एवढा पाऊस झाला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.