सिंधुदूर्ग - जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हा सध्या राजकीय कलगीतुऱ्याचा विषय बनला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधताना राऊत हे दलाल असल्याचे म्हटले आहे. तर विनायक राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाविद्यालयात खोडा आणला नसल्याचा राणेंचा दावा -
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरून सध्या राजकीय कलगीतुरा रंगलेला पहायला मिळतोय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपण या वैद्यकीय महाविद्यालयात खोडा आणला नसल्याचा दावा केलाय. तर विकासाच्या बाबतीत मी कधी खोडा घालणार नाहीत, असा दावा केलाय. खासदार विनायक राऊत सगळीकडे दलाली करत फिरतोय असं सांगत नारायण राणेंनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर टिका केलीय.
नारायण राणे अन् विनायक राऊत यांच्यात कलगीतुरा नाव न घेता विनायक राऊत यांचा राणेंवर निशाणावैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रकाराविरोधात आपण मंत्र्याकडे पुन्हा एकदा तक्रार देणार आहोत. सिंधुदूर्गातील महाविद्यालयाची सर्व तयारी सुसज्ज आहे. शेवटचे अपिल दोन दिवसात केलं जाईल आणि त्याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या संदर्भातील तक्रार सुद्धा केली जाईल. केंद्रीय आरोग्य विभागाची यंत्रणा कशी बोलते त्याच्या ऑडिओ क्लिप सुद्दा आपण सादर करणार असल्याची माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिलीय. तसेच यावेळी त्यांनी नाव न घेता नारायण राणे यांचाच या महाविद्यालयांना परवानगी न मिळण्याकरिता हात असल्याचा आरोप केला आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाचा काय आहे हा प्रकल्प -
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र शासनाच्या एन.एम.सी. मान्यता दिली आहे. या वर्षीपासून हे महाविद्यालय ओरोस येथे सुरु होणार आहे. या महाविद्यालयामध्ये एम.बी.बी.एस. च्या १०० जागा असणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक प्रस्ताव देण्यात आले. या महाविद्यालयाला तात्काळ कॅबिनेटमध्ये मान्यता देण्यात आली. हे महाविद्यालय ओरोस जिल्हा रुग्णालयाच्या २० एकर जागेमध्ये साकारणार आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास नॅशनल मेडिकल कौन्सिलने दिलेली परवानगी अवघ्या 48 तासात रद्द करण्यात आली. यावरून जिल्ह्यात राजकारण तापले आहे. जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला केंद्राच्या मान्यतेसाठी जुलैमध्ये केंद्रीय समितीने पाहणी दौरा केला होता.