ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्यापासून पूर्णतः लॉकडाऊन

author img

By

Published : May 8, 2021, 9:10 PM IST

'सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे उद्या (9 मे) रात्री १२ वाजल्यापासून १५ मे पर्यंत जिल्ह्यात पूर्णतः लॉकडाऊन करण्यात येणार आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांना बंदी नसेल. पण कोरोना चाचणी बंधनकारक असेल. शिवाय त्यांना 14 दिवस क्वारंटाइन राहावे लागेल', असे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

SAMANT
सामंत

मुंबई - सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे रविवारी (9 मे) रात्री १२ वाजल्यापासून १५ मे पर्यंत जिल्ह्यात पूर्णतः लॉकडाऊन करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 'जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक आहे. तसेच, त्यांना 14 दिवसांचा होम क्वारंटाइन सक्तीचा केला आहे. पर्यटकांनाही बंदी घालण्यात आली आहे', असे सामंत यांनी म्हटले आहे.

९ मे पासून १५ मे पर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन

'राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे काही जिल्ह्यात कठोर निर्बंध लावले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आज आढावा घेतला. 2 लाख लोक बाहेरुन आले आहेत. त्यापैकी 1 लाख लोकांमध्ये ५० ते ६० लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. स्थानिक राजकीय नेत्यांशी यासंदर्भात चर्चा केली. तालुके, गावातील रुग्णसंख्येची माहिती घेतली. त्यानुसार ९ मे पासून १५ मे पर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे', अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

'माझे सिंधुदुर्ग माझी जबाबदारी' मोहीम

'पूर्णतः लॉकडाऊनबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर नियमावली जाहीर केली आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास मुभा आहे. परंतु, येत्या 6 दिवसांत जिल्ह्यातील दुकाने, व्यापार - उद्योगधंदे, मच्छी व मटणाची दुकाने पूर्णतः बंद ठेवून पार्सल सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आंबा व्यापाऱ्यांना मात्र काहीशी सूट दिली आहे. त्यांनी नियमांचे पालन करणे सक्तीचे आहे. तर कृषी अवजारे, शेतीविषयक वस्तू सकाळी ५ वाजेपर्यंत मिळतील, अशी संबंधितांनी व्यवस्था करावी. रेशनिंग दुकाने कोविड नियमांचे पालन करुन सकाळी ७ ते ११पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेच्या धर्तीवर 'माझे सिंधुदुर्ग माझी जबाबदारी' ही मोहीम राबविण्यात येणार आहे', असेही सामंत म्हणाले.

'जिल्हाबंदी नाही'

'सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्यांना बंदी घातलेली नाही. नियमांचे पालन, आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. तसेच स्वॅब टेस्ट केल्यानंतरच जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल. त्यानंतर 14 दिवस होम क्वारंटाइन राहाणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन केल्यास जिल्हा आणि पोलीस प्रशासन कारवाई करेल', असे सामंत यांनी सांगितले.

'ऑक्सिजन प्लांट होणार'

'जिल्ह्यात ऑक्सिजनची कमरतात भासू नये यासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच ऑक्सिजन प्लांट उभारले आहेत. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होणार नाही यासाठी विशेष काळजी आणि खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच लसीकरणही 2 टप्प्यात करण्यात येत आहे', असे सामंत म्हणाले.

हेही वाचा - येवला शहरात आजपासून ११ मे पर्यंत चार दिवस जनता कर्फ्यू

हेही वाचा - मराठा नोकरभरतीसंदर्भात छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.