ETV Bharat / state

गोव्यातील पर्यटकांची कार दोडामार्ग तिलारी कालव्यात कोसळली

गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूला कालवा असल्यामुळे अशा प्रकारचे अपघात होत आहेत. त्यामुळे आता याबाबत योग्य ती दखल तिलारी बांधकाम विभागाने घ्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग
author img

By

Published : Dec 20, 2020, 2:56 PM IST

सिंधुदुर्ग - चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी येथील तिलारी कालव्यात कार कोसळल्याचा प्रकार आज घडला. यात सुदैवाने प्रवास करणार्‍या आठही प्रवाशांना मोठी दुखापत झालेली नाही. हा प्रकार आज रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला. गेल्या १५ दिवसात अपघाताचा हा दुसऱ्यांदा प्रकार घडला आहे.

गेल्या १५ दिवसातील दुसरी घटना

गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूला कालवा असल्यामुळे अशा प्रकारचे अपघात होत आहेत. त्यामुळे आता याबाबत योग्य ती दखल तिलारी बांधकाम विभागाने घ्यावी, तसेच आवश्यक त्या ठिकाणी योग्य ती व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

स्थानिकांनी केले मदतकार्य

अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. स्थानिक ग्रामस्थ सुशांत गवस, ईश्वर गवस, रुपेश गवस, राजू नाईक, शामसुंदर धर्णे यांनी पर्यटकांना बाहेर काढले. या कारमधून आठ प्रवाशी प्रवास करत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.