ETV Bharat / state

मालवणच्या खाडीक्षेत्रात पिंजऱ्यातील मत्स्यक्रांती; पारंपरिक मासेमारीला 'केज फार्मिंग'चा पर्याय - सिंधुदुर्ग मासेमारी

मालवण तालुक्यातील तोंडवळी खाडीमध्ये तरंगणारे तराफे लक्ष वेधून घेतात. पाण्यावर तरंगणाऱ्या या तराफ्यांना पाण्यात पिंजरे बांधलेले आहेत. त्यात जिताडा माशाचे पालन केले जाते. येथील शिवशंभो पुरुष बचतगटाने हे मत्स्य पालन सुरू केले आहे.

fishing in malwan
मालवणच्या खाडीक्षेत्रात पिंजऱ्यातील मत्स्यक्रांती; पारंपारिक मासेमारीला 'केज फार्मिंग'चा पर्याय
author img

By

Published : Jun 20, 2020, 7:13 PM IST

सिंधुदुर्ग - मालवण तालुक्यातील तोंडवळी खाडीमध्ये तरंगणारे तराफे लक्ष वेधून घेतात. पाण्यावर तरंगणाऱ्या या तराफ्यांना पाण्यात पिंजरे बांधलेले आहेत. त्यात जिताडा माशाचे पालन केले जाते. येथील शिवशंभो पुरुष बचतगटाने हे मत्स्य पालन सुरू केले आहे.

कोकणच्या समुद्रात अत्याधुनिक मासेमारी नौकांचे अतिक्रमण वाढले आहे. अनधिकृतपणे केली जाणारी मासेमारी यामुळे पारंपरिक साधनांनी मासेमारी करणारा मच्छिमार दुष्काळाच्या खाईत लोटला जात आहे. यामुळे त्याला खाडीच्या पिंजऱ्यांतील मत्स्य पालनाची नवी पद्धत आशादायी वाटू लागलीय. पिंजऱ्यातील मत्स्य पालनाला 'केज कल्चर' फिश फार्मिंग म्हटलं जात. शासनाच्या कांदळवन विभागामार्फत कांदाळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना राबवण्यात येते. योजनेची अंमलबजावणी आणि नियंत्रण अप्पर प्रधान मुख्य वनसरंक्षक कांदळवन कक्ष, मुंबई यांच्याकडून करण्यात येत आहे. मत्स्य पालनाचा हा प्रकल्प या योजनेचा एक भाग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खाडी क्षेत्रात असे ८० प्रकल्प सध्या कार्यरत आहेत.

तोंडवळीतील प्रकल्पात सरपंच आबा कांदळकर आणि बचतगटाचे अध्यक्ष श्रीकृष्ण नामदेव पुजारे यांच्या नेतृत्वाखाली मत्स्य पालनाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाला सरकार ९० टक्के अनुदान देते. तर १० टक्के गुंतवणूक बचतगटाची असते.

आपण त्यांना चार पिंजरे दिलेले आहेत. प्रत्येक पिंजऱ्यात सोडायला चार हजार जिताडा माशाची पिल्ले देण्यात आली आहेत. हे मासे एकमेकांना खातात; म्हणून त्यांचे दर १५ दिवसांनी ग्रेडिंग करावे लागते. अशी माहिती प्रकल्प समन्वयक नेहा किशोर नार्वेकर यांनी दिली.

मालवणच्या खाडीक्षेत्रात पिंजऱ्यातील मत्स्यक्रांती; पारंपारिक मासेमारीला 'केज फार्मिंग'चा पर्याय

आम्ही खाडीकिनारच्या प्रत्येक गावात कांदळवन सव्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून या बचतगटांचं काम चालत असल्याचे नेहा नार्वेकर यांनी सांगितले. या प्रकल्पात १२ कुटुंबं सहभागी झाल्याचे त्या म्हणाल्या. समुद्रातील मासेमारीपेक्षा ही पद्धत जास्त फायदेशीर व कमी जोखमीची वाटते. जाळ्यांचा खर्च वाचतो. अनेकवेळा समुद्रात जाळी तुटून जातात त्यामुळे आमचे मोठे नुकसान होते. असे सूर्यकांत शामराव पुजारे यांनी सांगितले. ते शिवशंभो पुरुष बचतगट तोंडवळीचे सचिव आहेत.

याव्यतिरिक्त ते पारंपरिक पद्धतीने देखील मासेमारी करतात. हा प्रकल्प अत्यंत फायदेशीर आहे, परंतु मत्स्य बीज व खाद्य महाराष्ट्रात मिळत नसल्याने काही प्रमाणात अडचणी येतात. आंध्र प्रदेश, ओरिसाच्या शेतकऱ्यांना ३ रुपयाला मिळणारे बीज आम्हाला ३० रुपये किंमतीला मिळते. यामुळे प्रकल्पाची गुंतवणूक वाढते. हे बीज आणि खाद्य या ठिकाणी उपलब्ध झाल्यास मच्छिमारांना मोठा फायदा होईल, असे तोंडवळी गावचे सरपंच आबा कांदळकर यांनी सांगितले. ते स्थानिक कांदळवन सव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत.

लोकांनीही हा प्रकल्प आपला समजून केल्यास निश्चित यश आहे, असे कांदळकर याना वाटते. येथील खडीपात्रात अशा पद्धतीने मत्स्य व्यवसाय उभा रहण्यासाठी आबा कांदळकर हे मोठी मेहनत घेत आहेत. एकंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यात केज कल्चर फिश फार्मिंगच्या माध्यमातून येथील खाडी क्षेत्रात नवी मत्स्य क्रांती उभी होत आहे. या ठिकाणच्या समुद्रात मच्छिमारांमध्ये भडकणाऱ्या सततच्या आधुनिक विरुद्ध पारंपरिक युद्धाला फाटा देण्यासाठी आशेचा नवा किरण समोर येत आहे.त्रात नवी मत्स्य क्रांती उभी राहत आहे. इथल्या समुद्रात मच्छिमारांमध्ये भडकणाऱ्या सततच्या आधुनिक विरुद्ध पारंपरिक युद्धाला फाटा देण्यासाठी आशेचा एक नवा किरण समोर येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.