ETV Bharat / state

मद्य वाहतूक प्रकरणी दोघांना अटक, 8 लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त

author img

By

Published : Dec 12, 2020, 8:59 PM IST

गोवा बनावटीची दारू घेऊन गोव्यातून कणकवलीच्या दिशेने निघालेला टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाने पकडा आहे. या टेम्पोमधून 8 लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Seizure of illegal liquor Sindhudurg
अवैध दारूसाठा जप्त

सिंधुदुर्ग - गोवा बनावटीची दारू घेऊन गोव्यातून कणकवलीच्या दिशेने निघालेला टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाने पकडा आहे. या टेम्पोमधून 8 लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

टॉनी रेमेत फर्नांडिस (वय ३१, रा. फणसनगर-वरवडे, ता. कणकवली) आणि शाहिद नासीर शेख (रा. कोलगाव, ता. सावंतवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोव्यातून कनकवलीकडे येत असलेल्या एका टेम्पोमध्ये मद्यसाठा असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या बांदा येथे सापळा रचण्यात आला. संबंधित टेम्पो या ठिकाणी येताच पोलिसांनी टेम्पोला थांबण्यास सांगितले. पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळून आला, पथकाने दारूसह 8 लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते गोवा बनावटीच्या दारूची विक्री

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोव्यातून मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने गोवा बनावटीची दारू येते. अनेक लोक या उद्योगात गुंतलेले आहेत. सीमावर्ती भागात तर समुद्रा मार्गेही या दारूची वाहतूक होते. जिल्हा पोलिसांनी केलेल्या कारवाईत गेल्या दोन महिन्याच्या काळात सुमारे ३० लाखांची दारू पकडण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.