ETV Bharat / state

सिंधुदुर्गात राणेंचं वर्चस्व; भाजपचा 45, तर शिवसेनेचा 21 ग्रामपंचायतीत विजय

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपने 43 ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे. तर शिवसेनेने 23, राष्ट्रवादीने 1 आणि गाव पॅनेलने 3 ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे.

bjp-won-fourty-three-gram-panchayats-in-sindhudurg
सिंधुदुर्गात राणेंच वर्चस्व; भाजपचा 43, तर शिवसेनेचा 23 ग्रामपंचायतीत विजय
author img

By

Published : Jan 18, 2021, 4:02 PM IST

सिंधुदुर्ग - ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपने 45 ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे. तर शिवसेनेने 21, राष्ट्रवादीने 1 आणि गाव पॅनेलने 3 ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे. जिल्ह्यात राणेंनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. त्यामुळे मालवणमध्ये आमदार वैभव नाईक यांना, तर सावंतवाडीमध्ये माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे.

सिंधुदुर्गात राणेंच वर्चस्व

देवगड मतदारसंघात भाजपाला बहुमत -

देवगड विधानसभा मतदारसंघात आमदार नितेश राणे यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. देवगड तालुक्यात भाजपने 17 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली आहे. तर शिवसेना 4, राष्ट्रवादी 1 आणि गाव पॅनलने 1 ग्रामपंचायतमध्ये विजय मिळवला आहे. वैभववाडी तालुक्यात 9 भाजप, तर 4 ग्रामपंचायतीत शिवसेनेने विजय मिळवला आहे. कणकवलीत 2 शिवसेना आणि 1 ग्रामपंचायतीत भाजपने विजय मिळवला आहे.

मालवणमध्ये वैभव नाईकांना धक्का -

मालवण विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार वैभव नाईक यांना धक्का बसला आहे. मालवण तालुक्यात 5 ग्रामपंचायतींवर भाजपाने सत्ता मिळविली आहे. तर 1 ग्रामपंचायत शिवसेनेने विजय मिळवला आहे. तर कुडाळ तालुक्यात 4 ग्रामपंचायतींवर भाजप, 4 ग्रामपंचायतींवर शिवसेना आणि 1 ग्रामपंचायतींवर गाव पॅनलने विजय मिळवला आहे.

सावंतवाडीत दीपक केसरकर यांना धक्का -

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे. सावंतवाडी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या कोलगाव ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. तर भाजपा आमदार आशिष शेलार यांची सासुरवाडी असलेल्या दांडेली ग्रामपंचायतीवर भाजपाचे कमळ फुलले आहे. तालुक्यात 8 ग्रामपंचायतीत भाजपाने, तर 3 ग्रामपंचायतीत शिवसेने विजय मिळवला आहे. दोडामार्ग तालुक्यात 2 ग्रामपंचायतीत शिवसेनेने, तर 1 ग्रामपंचायत ग्रामविकास पॅनलने जिंकली आहे. वेंगुर्ले तालुक्यात 1 ग्रामपंचायतींत शिवसेनेने आणि 1 ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे. एकंदरीत जिल्ह्यात भाजपाने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

हेही वाचा - बर्ड फ्लूचे संकट: मुंबईत २४ तासांत २१४ पक्ष्यांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.