ETV Bharat / state

ठाकरेंचे कोकणाशी वाकडे, राहुल गांधी व उद्धव ठाकरेंना शेतीतले काय कळते? - सिंधुदुर्ग चिपी विमानतळ न्यूज

उद्धव ठाकरेंना शेतीतले काय कळते? या ठाकरेंचे कोकणाशी वाकडे आहे. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा हे ठाकरे दौरा करायचे. शेतकऱ्यांना पैसे देणार होते. आता मुख्यमंत्री झाल्यावर किती दिले? फक्त फसवणूक केली. काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीत कोण आहे जनतेचे काम करणारा? भाजप हा एकच पक्ष आहे, जो समाजकार्य करतो, नारायण राणे म्हणाले.

खासदार नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

author img

By

Published : Jan 7, 2021, 7:35 PM IST

सिंधुदुर्ग - प्रधानमंत्री मोदी यांनी देश महासत्ता बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी शेतकरी,सबळ बनविले पाहिजे, कष्ट करी समृद्ध झाला पाहिजे यासाठी विध्येयके आणली. ७० वर्षांचे कायदे मोडीत काढले आणि शेकऱ्यांला जास्त पैसे मिळतील, तेथे शेतमाल विकावा, असा कायदा आणला. मात्र मोदींविरोधात राजकीय आंदोलने केली जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींनाला शेतीतील काय कळते? त्यांनी शेती केली आहे काय कधी? दलाली मोडीत काढली म्हणून काँग्रेसने दलालांना कामाला लावले, अशी टीका माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी केली.

खासदार नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरेंना शेतीतील काय कळते?

उद्धव ठाकरेंना शेतीतले काय कळते? या ठाकरेंचे कोकणाशी वाकडे आहे. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा हे ठाकरे दौरा करायचे. शेतकऱ्यांना पैसे देणार होते. आता मुख्यमंत्री झाल्यावर किती दिले? फक्त फसवणूक केली. काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीत कोण आहे जनतेचे काम करणारा? भाजप हा एकच पक्ष आहे, जो समाजकार्य करतो, असेही राणे यावेळी म्हणाले.

हेही वाचा - गावाच्या विकासासाठी 'तृतीयपंथी' अंजलीने खोचला पदर!

एका दिवसात परवानगी चिपी विमानतळासाठी आणतो

राज्यात हे ठेकेदारांचे सरकार आहे. पालकमंत्री एक ठेका घेतात आणि चार ठेकेदार जोडतात. आज चौपदरी करणाचे काम सिंधुदुर्गमध्ये फास्ट झाले. रत्नागिरीत अजून अर्धवट आहे. कारण, हे ठेकेदारीसाठी भांडतात, टीका त्यांनी यावेळी अशी केली. 'एका दिवसात परवानगी चिपी विमानतळासाठी आणतो, आधी त्या विमानतळावर जाणार रस्ता करा, पाण्याची ,लाईटची व्यवस्था करा. केंद्रात सत्ता आमची आहे. तुमचा काय संबध या विमानळाशी,' असा सवाल यावेळी खासदार राणे यांनी केला.

ओवाळून टाकलेले लोक आम्हाला भाजपात नको

देशाला महासत्ता करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आणि भाजपच्या पाठीशी असेच कायम राहा, असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले. जे भाजपला सोडून सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी गेलेले आहेत, ते आता पुन्हा भाजपात येण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना विनंती करतात. असले ओवाळून टाकलेले लोक आम्हाला भाजपात नको, असेही त्यांनी आपल्याला सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना सुनावले.

हेही वाचा - अन्वय नाईक आत्महत्या : आरोपींच्या अटक वॉरंटसाठी अर्ज, 6 फेब्रुवारीला सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.