ETV Bharat / state

प्रताप सरनाईक काही साधुसंत नाही - नारायण राणे - भाजप खासदार नारायण राणे सिंधुदुर्ग

शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) पथक दाखल झाले आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचे पथक दाखल झाले असून शोधमोहीम सुरू आहे. त्यावर प्रताप सरनाईक हा काही साधुसंत नाही, असे मत भाजप खासदार नारायण राणे यांनी बोलताना व्यक्त केले.

नारायण राणे
नारायण राणे
author img

By

Published : Nov 24, 2020, 3:41 PM IST

सिंधुदुर्ग - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विविध मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयाकडून छापा टाकण्यात आला. त्यावर प्रताप सरनाईक हा काही साधुसंत नाही, असे मत भाजप खासदार नारायण राणे यांनी सरनाईक यांच्यावर पडलेल्या छाप्याबाबत बोलताना व्यक्त केले. तसेच कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्याशिवाय याबाबत बोलणे उचित ठरणार नाही असेही ते म्हणाले.

नारायण राणे बोलताना

शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) पथक दाखल झाले आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचे पथक दाखल झाले असून शोधमोहीम सुरू आहे. प्रताप सरनाईक यांचे पूत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले असल्याचे कळत आहे. 'ईडी'ने एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहीम सुरू आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेस आहे.

प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर

ईडीकडून मुंबई आणि ठाणे परिसरातील १० ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचे पथक दाखल झाले आहे. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली असून एकूण १० ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. याबाबत भाजप खासदार नारायण राणे यांना विचारले असता त्यांनी प्रताप सरनाईक हे काही साधुसंत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.