ETV Bharat / state

Santosh Parab Attack Case : भाजप आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी

संतोष परब हल्ल्याप्रकरणी ( Santosh Parab Attack Case ) तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी तब्बल दीड तास आमदार नितेश राणेंची ( MLA Nitesh Rane ) चौकशी केली. भाजप आमदार नितेश राणे यांच्यासोबत यावेळी त्यांचे वकील संग्राम देसाई ( Advocate Sangram Desai ) उपस्थित होते.

Bjp Mla Nitesh Rane present in Kankavali Police station over Santosh Parab case
भाजप आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी
author img

By

Published : Jan 24, 2022, 3:12 PM IST

Updated : Jan 24, 2022, 3:22 PM IST

सिंधुदुर्ग - शिवसैनिक संतोष परब हल्यातील ( Santosh Parab Attack Case ) आरोपी असलेले आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) आज कणकवली पोलीस ठाण्यात ( Kankavli Police Station ) हजर झाले. भाजप आमदार नितेश राणे यांच्यासोबत यावेळी त्यांचे वकील संग्राम देसाई ( Advocate Sangram Desai ) उपस्थित होते. संतोष परब हल्ल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली आहे.

आमदार नितेश राणे कवकवली पोलीस ठाण्यात हजर

पोलिसांचा नकार -

संतोष परब हल्ल्याप्रकरणी तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी तब्बल दीड तास आमदार नितेश राणेंची चौकशी केली. आमदार नितेश राणे हे संतोष परब हल्ल्याच्या गुन्ह्यात तपासकामी पोलीस ठाण्यात आले होते, इतकेच सांगत अधिक तपशील सांगण्यास पोलीस निरीक्षक हुंदळेकर यांनी नकार दिला.

हेही वाचा - Sharad Pawar Corona Positive : शरद पवार यांना कोरोनाची लागण; पवारांनी केली विनंती

प्रकरण काय?

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक निवडणूक सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष परब हे मोटरसायकल वरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले.

Last Updated : Jan 24, 2022, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.