ETV Bharat / state

Nilesh Rane : दीपक केसरकरांनी आपल्या औकातीत रहावं, अन्यथा...; निलेश राणेंचा थेट इशारा - निलेश राणेंचा केसरकरांना थेट इशारा

दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी आपल्या औकातीत रहाव, आम्हाला नखं लावाल तर फाडून टाकू, असा इशारा भाजपाचे युवा नेते निलेश राणे ( BJP youth leader Nilesh Rane ) यांनी दिला आहे. दरम्यान केसरकर यांचा वरचा मजला रिकामा आहे. त्यांना मानसिक आजार झाला आहे, अशी टीकाही राणेंनी केली आहे.

Nilesh Rane
Nilesh Rane
author img

By

Published : Aug 7, 2022, 6:54 PM IST

सिंधुदुर्ग - आम्ही ठाकरेंचं ऐकलं नाही तर केसरकर तुमचं काय ऐकणार. दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी आपल्या औकातीत रहाव, आम्हाला नखं लावाल तर फाडून टाकू, असा इशारा भाजपाचे युवा नेते निलेश राणे ( BJP youth leader Nilesh Rane ) यांनी दिला आहे. दरम्यान केसरकर यांचा वरचा मजला रिकामा आहे. त्यांना मानसिक आजार झाला आहे. त्यामुळे ते एक वेळ ठाकरेंच्या विरोधात बोलतात, तर काही वेळाने त्यांच्या बाजूने बोलतात. त्यामुळे त्यांनी औकातीत राहून बोलावे, असा टोलाही निलेश राणेंनी लगावला आहे.

'...त्यांच्या डोक्याचा वरचा मजला रिकामा' : निलेश राणे यांनी सकाळी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून आमदार केसरकर यांच्यावर टीका केली होती. यावेळी आमच्या सोबत काम करायचे आहे, असे सांगणाऱ्या केसरकारांसाठी आपल्या ड्रायव्हरची जागा १ तारीखपासून रिकामी आहे. त्या ठिकाणी तुम्ही या, असा सल्ला दिला होता. परंतु काही वेळाने त्यांनी सिंधुदुर्गमध्ये बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून काम करत असताना आपण कोणीतरी मोठे झाल्यासारखे वागत आहेत. त्यांच्या डोक्याचा वरचा मजला रिकामी झाला आहे. त्यांना मानसिक आजार झाला आहे. त्यामुळे ते एक वेळ ठाकरेंच्या विरोधात बोलतात आणि काही वेळाने त्यांच्या बाजूला बोलतात. त्यामुळे त्यांना नेमके काय बोलायचे आहे, तेच कळत नाही, अशी टीकाही राणे यांनी केली आहे.

'...तर फाडून टाकू' : आमच्या सोबत काम करणाऱ्यास तयार आहेत, असे सांगत आहेत. परंतु हे आमच्यासोबत काम करणार त्यामुळे आम्ही थांबलो होतो, असा अर्थ होतो. परंतु आम्हाला त्यांची गरज नाही. त्यांच्या मतदारसंघात त्यांची ताकद आणि अवकात काय आहे. हे आम्ही त्यांना वेळोवेळी दाखवून दिले आहे. उगाच आमच्या भानगडीत पडू नका, अन्यथा नख लावाल तर फाडून टाकू, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान सुशांत सिंग व दिशा सालियन प्रकरणात नारायण राणे व राणे कुटुंबाकडून आरोप करण्यात आले, असे म्हणणाऱ्या केसरकरांनी न्यायालयात नेमकी कोणाचे नाव पुढे आले, याचा अभ्यास करावा नंतरच बोलावे, असाही इशारा निलेश राणेंनी दिला आहे.

हेही वाचा - Sunil Raut : 'संपूर्ण कुटुंबाला ईडीने अटक केली, तरी घाबरणार नाही; शिवसेना सोडणार नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.