ETV Bharat / state

सिंधुदुर्गात वेगळ्या राजकारणाची नांदी.. शिवसेना नेते, नितेश राणे अन् भाजपातील राणे समर्थक एकाच व्यासपीठावर - शिवसेना नेते व राणे समर्थक एकाच व्यासपीठावर

वेगुर्ले नगरपरिषदेच्या वेगुर्ले सागररत्न मत्स्य बाजारपेठ लोकार्पणाच्या निमित्ताने आज राजकीय वर्तुळातील वेगळा अनुभव पहायला मिळाला. या निमित्ताने शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. शिवसेना खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना आमदार दिपक केसरकर आणि भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण, भाजपचे आमदार नितेश राणे एकाच व्यासपीठावर होते.

beginning of a different politics in Sindhudurg

author img

By

Published : Jul 11, 2021, 7:51 PM IST

Updated : Jul 11, 2021, 8:02 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात राजकीय राडे अनेक वेळा पहायला मिळालेत. सेना आणि राणे यांच्यातील रंगलेला राजकीय कलगीतूरा नेहमी या जिल्ह्यात अनेकवेळा पहायला मिळाला. सध्यातरी राणे आणि शिवसेना यांच्यातून विस्तव जात नाही, अशीच स्थिती आहे. भाजपाने तर शिवसेनेला रोखण्यासाठी केंद्रात राणेंना मंत्रिपद दिले आहे, अशी चर्चा आहे. परंतु अशा गंभीर वातावरणातही वेंगुर्ले येथे या दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आले होते. वेगुर्ले नगरपरिषदेच्या वेगुर्ले सागररत्न मत्स्य बाजारपेठ लोकार्पणाच्या निमित्ताने आज काही वेगळं घडलं. याची एकच चर्चा सध्या कोकणात सुरू आहे.

आम्ही विकासासाठी एकत्र आलो -

वेगुर्ले नगरपरिषदेच्या वेगुर्ले सागररत्न मत्स्य बाजारपेठ लोकार्पणाच्या निमित्ताने आज राजकीय वर्तुळातील वेगळा अनुभव पहायला मिळाला. या निमित्ताने शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. शिवसेना खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना आमदार दिपक केसरकर आणि भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण, भाजपचे आमदार नितेश राणे एकाच व्यासपीठावर होते. राणे आणि सेना यांच्यातील राजकीय वैर नेहमी पहायला मिळते मात्र या वेळी चित्र उलट होते. नितेश राणे आणि विनायक राऊत हे कानात हितगुज करताना पाहायला मिळाले. नितेश राणेंनी तर जाहीर भाषणातून सेना आणि भाजपच्या युतीवर भाष्य केले. हल्ली युतीची चर्चा बंद होती पण हे चित्र पाहिल्यानंतर युतीची चर्चा करणाऱ्यांना चांगली झोप लागेल. या चित्रामुळे युतीची चर्चा नक्की रंगेल. वरिष्ठांनी आदेश दिला तर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करू, असं वेगळे राजकीय संकेत भाजप आमदार नितेश राणेंनी दिलेत. याबाबत माध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी विकासासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. यात काही राजकारण नाही तुम्हाला काय ब्रेकिंग चालवायच्या आहेत त्या चालवा, असे ते म्हणाले.

सिंधुदुर्गात वेगळ्या राजकारणाची नांदी..
बाळासाहेबांनी दिलेली ही विचारांची श्रीमंती -
नितेश राणे हे भाषण संपवून व्यासपीठाच्या खुर्चीवर विराजमान झाले. त्यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांची पाठ थोपटली. खासदार विनायक राऊत यांनी जाहीर भाषणात आपण आणि नितेश राणे मित्र असल्याचे बोलून दाखवलं. मी नितेश राणे यांचे अभिनंदन करतो. अभिनंदन करायला सुद्धा मोठं मन लागतं असं सांगत खासदार विनायक राऊत यांनी कोकणातले राजकीय नेते विकास कामांसाठी एकत्र येतात याची झलक दाखवली. दरम्यान याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारतात ही बाळासाहेबांनी आम्हाला विचारांची दिलेली श्रीमंती आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.
नांदा सौख्य भरे, नारायण राणेंचा सल्ला -
या वास्तूच्या लोकार्पणाच्या भाषणात लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी सर्वच नेत्यांनी कोकणाच्या विकासासाठी एकत्र येण्याची सल्ला दिला आणि नांदा सौख्य भरे असे सांगत एक वेगळा राजकीय संदेश कोकणातून दिला.
राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली -
सेना आणि राणे यांचे राजकारणात पटत नाही. नाराय़ण राणेंना मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्याच मोठ्या कार्यक्रमात सेना आणि भाजप किंबहुना राणे एकत्र आले. हे एकत्र येणं वेगळ्या राजकारणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Last Updated : Jul 11, 2021, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.